समुद्रविज्ञान तंत्रज्ञान संबंधाने हवे स्वतंत्र विद्यापीठ

समुद्रविज्ञान तंत्रज्ञान संबंधाने हवे स्वतंत्र विद्यापीठ

Published on

-rat९p३.jpg-
२५N९०३०८
रत्नागिरी ः रापणद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार.
------
समुद्र कोकणात, विद्यापीठ नागपुरात ः भाग २-------लोगो

समुद्रविज्ञान तंत्रज्ञान संबंधाने हवे स्वतंत्र विद्यापीठ
पाण्याखालील तंत्रज्ञानही महत्वाचे ; कृषी पदवीत अंतर्भूत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः कोकण कृषी विद्यापीठाने कृषी, फलोत्पादन, वन, कुरण विकास व मत्स्यविज्ञान विकास प्रादेशिक स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण; परंतु एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब केला आहे. डॉ. एम. एस. स्वामिनाथन समितीने याच संकल्पनेवर आधारित कृषी पदवीचा पुरस्कार केला आहे. समुद्रविज्ञान आणि पाण्याखालील तंत्रज्ञान या संबंधाने स्वतंत्र विद्यापीठ होण्याची गरज आहे, असे मत अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केला.
अॅड. पाटणे म्हणाले, जगात माशांचे २१ हजार जाती असल्याचे सर फ्रान्सिस डे यांचे म्हणणे आहे. भारतात १६०० जातीचे मासे असून, महाराष्ट्रात ६०० प्रकारचे मासे आहेत. त्यातील ४५० खाऱ्या पाण्यात तर १५० गोड्या पाण्यात आहेत. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मत्स्योत्पादनाचा केवळ १ टक्के वाटा असून, १४ कोटी ५० लाख लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. एकूण उत्पादनांपैकी मासेमारीतून ३९ टक्के तर मत्स्यसंवर्धनातून ६१ टक्के उत्पादन घेणारा भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मत्स्यनिर्यातीमध्ये केरळ प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईसह सात सागरी जिल्ह्यात ४५६ मासेमारी करणारी गावे आहेत. कोकण किनारपट्टीवरील माशांची विविधता आपण लक्षात घेतली पाहिजे, अशी मासेमारी हा ग्रामीण शेती उत्पादनाचा एकात्म घटक आहे, असे जगभर मानले जाते.
इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्च नवी दिल्ली या महत्त्वाच्या संस्थेने शेतीवर आधारित उत्पादन चालवण्याकरिता भर दिला आहे. भात व मत्स्यशेती आशिया खंडात यशाचे सूत्र म्हणून मान्यता पावली आहे. मत्स्य जीवशास्त्र, अॅक्वाकल्चर, मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्य इंजिनिअरिंग या सर्व बाजू शेती विज्ञानाला संलग्न आहेत. भारतीय कृषिक्षेत्रामध्ये पिके, वृक्ष, कीटक या जीवघटकांचा समन्वय आहे.
वाढते शहरीकरण, तिवरांच्या बेटांचा नाश, माशांच्या प्रजोत्पादन काळातील मच्छीमारी, प्रदूषण तसेच लहरी निसर्ग यामुळे आधीच मच्छीमार पुरता कात्रीत सापडला आहे. अशावेळी यांत्रिकी बोटीची क्षमता वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाने खोल पाण्यातील मच्छीमारी वाढवावी लागेल. अतिमासेमारी जागतिक समस्या आहे. २०३० पर्यंत दोन कोटी टन मत्स्योत्पादनाचा टप्पा गाठायचा झाल्यास समुद्र, खाड्यातील मत्स्यशेतीशिवाय अन्य पर्याय नाही. मासे हा कच्चा माल म्हणून न विकता मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बाजारपेठेत आले तर मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट होईल. मत्स्यविद्यापिठात सर्व प्रकारचे तांत्रिक व अद्ययावत शिक्षण मिळाल्यास रोजगार क्षमता वाढवून निर्यातीत भर पडेल. कोकणातील ही मत्स्यसंपत्ती विदेशातील लोकांना आकर्षित करत आहे.

चौकट १
मत्स्योद्योग मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
केवळ गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी विदर्भात नागपूर व उद्गीरमध्ये मत्स्य महाविद्यालये आहेत. ती कमी पडतात म्हणून की, काय अमरावतीच्या धरणक्षेत्रात तिसरे मत्स्यविद्यालय प्रस्तावित आहे. याउलट लांबलचक ७२० कि.मी. किनारपट्टी व ७० खाड्यांसाठी केवळ रत्नागिरीचे एकच मत्स्य महाविद्यालय ते देखील नागपूरला जोडण्याचा प्रयत्न झाला, हे सारे खेदजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com