आंबा घाट बनतोय मृतदेहाच्या विल्हेवाटीचे ठिकाण
-rat९p६.jpg-
२५N९०३११
आंबाघाट
------
गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनला आंबाघाट
अनेक मृतदेहाची विल्हेवाट ; पोलिस चौकीसह गस्तीची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या ऐतिहासिक आंबाघाटाची नैसर्गिक सुंदरता गुन्हेगारांसाठी सोयीची बनली आहे. घाटाच्या निर्जनतेचा फायदा घेऊन खून करून मृतदेह घाटात फेकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे रोखण्याची काळाची गरज आहे. याला आळा घालण्यासाठी घाटाच्या हद्दीवर पोलिसचौकीची तातडीने निर्मिती करण्याची किंवा गस्त वाढवण्याची गरज स्पष्ट होत आहे. पोलिसांचा घाटात वावर राहिल्यास अशा गुन्हेगारीला प्रतिबंध बसेल.
हा घाट पर्यटकांसाठी निसर्गरम्य असला तरी गुन्हेगारांसाठी मात्र तो ''मृतदेह विल्हेवाटेचे ठिकाण'' बनला आहे. इतर जिल्ह्यांतून व्यक्तींचा खून करून त्यांचे मृतदेह आंबाघाटात आणून टाकण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाटद खंडाळा येथील दुर्वास पाटील याने भक्ती मयेकर आणि राकेश जंगम यांचा खून करून त्यांचे मृतदेह आंबाघाटात टाकल्याच्या ताज्या घटना उघडकीस आल्या. ही घटना या समस्येची गांभीर्य दाखवून देते. मुर्शी चेकपोस्टपासून आंब्यापर्यंतचा सुमारे १५ ते २० किमीचा परिसर घनदाट जंगल आणि निर्जन असल्यामुळे गुन्हेगार याचा गैरफायदा घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांना या घाटात अनेक मृतदेह सापडले आहेत.
सद्यःस्थितीत देवरूख पोलिस ठाण्याची हद्द जिथे सुरू होते त्याच्या आसपास पोलिसचौकी असणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिसचौकी झाल्यास घाटातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवणे शक्य होईल आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल. त्यामुळे खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता आहे. या भागातील किरबेट, देवडे, भोवडे, साखरपा, कोंडगावसारख्या गावातील रहिवाशांनाही पोलिसचौकीमुळे तत्काळ मदत मिळू शकेल तसेच, एखादा गुन्हेगार घाटमार्गे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला पकडणे सोपे होईल.
चौकट
वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे आव्हान
या गंभीर विषयाकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पोलिसदलात रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. असे असले तरी या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. अनेक पदे रिक्त असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीतरी उपाययोजना करून आंबाघाटात पोलिसचौकी उभारणे किंवा गस्त तरी वाढवण्याची आवश्यक आहे. यावर वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.