-भोस्ते घाटात अपघातांनंतरही प्रशासन सुस्तच

-भोस्ते घाटात अपघातांनंतरही प्रशासन सुस्तच

Published on

-rat९p२१.jpg-
P२५N९०३८२
खेड ः भोस्ते घाटातील धोकादायक वळण.
-----
भोस्ते घाटात अपघातांचे सत्र कायम
ठोस उपययोजनेचा आभाव; सहा महिन्यात ३५ अपघात
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातून प्रवास सुस्साट झाला असला तरी घाटातील वळण अपघातांच्यादृष्टीने शापित बनले आहे. घाटातील अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहनांना घडणाऱ्या अपघातांचे सत्र सुरू असतानाही प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. गेल्या ६ महिन्यात ३५हून अधिक अपघात होऊनही प्रशासन सुस्त आहे.
चौपदरीकरणादरम्यान भोस्ते घाटाला प्राधान्यक्रम देण्यात आला. चौपदरीकरणानंतर घाटातील अवघड वळणाला लागलेला शापितचा ''कलंक'' पुसला जाईल, अशी बांधण्यात आलेली अटकळ आजमितीस फोल ठरली आहे. घाटातील अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांना ''ब्रेक'' लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. घाटातील संरक्षक भिंतीवर लावण्यात आलेले टायर, वळणाच्या भागात बसवण्यात आलेले १६हून अधिक गतिरोधक या उपाययोजना फोल ठरल्या आहेत.
भोस्ते घाट उतरत असताना अवजड वाहतुकीच्या वाहनांवरील चालकाचा ताबा सुटून थेट वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळत आहेत. यामुळे संरक्षक भिंतीची मोडतोड होत आहे. यासाठीचे सारे उपाय फोल ठरत असताना दुसरीकडे याच वळणावर अपघातांचा धोका कायम राहिला. रस्त्यातच वाहनांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्रदेखील कायमच आहे. वाहने तेथेच उभी करून वाहनचालक काढता पाय घेत असल्याने बऱ्याचवेळा पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना अंदाजच येत नसल्याने अपघात घडत आहेत. गेल्या ६ महिन्यात दुचाकीस्वारांना हकनाक प्राणास मुकावे लागले आहे. अवजड वाहनांना विशेषतः रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकरचे अपघातही पोलिस यंत्रणेसाठी डोकेदुखीच ठरली आहे. आणखी किती दिवस घाटातून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करायचे, असे सवालही उपस्थित होत आहेत.
------
कोट
भोस्ते घाटातील अवघड वळणे आणि निसरडा रस्ता व गतिरोधक या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाने या संदर्भात लक्ष देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

--संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com