कोकण
पावसमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात
पावसमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात
पावस ः पावसमध्ये ईद-ए-मिलाद जमातुल मुस्लिमिन दखनी मोहल्लातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त सजावट, विद्युत रोषणाई, मिरवणूक काढली. हजरत शेख महंमद पीरदर्गा ते काझी मोहल्ला, दखनी मोहल्ल्यातून मिरवणूक काढून जामा मस्जिद दखनी मोहल्लामध्ये ईद-ए-मिलाद कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्ष वसीम शौकत म्हालदार, रिजवान रोशनखान फडनाईक, दाऊद म्हामूद मुजावर, फैजल दाऊद झारी, ईकबाल अ. फडनाईक आदींनी परिश्रम घेतले.