लेख लेखन स्पर्धेत राधा बेर्डे प्रथम
-rat९p२९.jpg-
२५N९०४१८
लांजा ः भांबेड येथील जिल्हास्तरीय लेख लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या राधा बेर्डे यांना बक्षीस देताना अमोल रेडीज.
----
लेख लेखन स्पर्धेत राधा बेर्डे प्रथम
लांजा, ता. १० ः तालुक्यातील भांबेड पेठदेव येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय लेख लेखन स्पर्धेत राधा बेर्डे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
मंडळाचा ४४वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात झाला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पत्रकार स्व. जगदीश कदम जिल्हास्तरीय लेख लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचा बक्षीस समारंभ झाला. यामध्ये जिल्ह्यातून २४ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम क्रमांक राधा बेर्डे यांना १५०० रुपये, चषक प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक दिलीप चव्हाण यांना एक हजार रुपये, चषक, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक विभागून श्रेया कोरगांवकर, आफरीन शेख यांना ७५० रुपये, चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात आली.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.