-एक कोटीच्या गुहागर क्रीडा संकुलाची दुरवस्था

-एक कोटीच्या गुहागर क्रीडा संकुलाची दुरवस्था

Published on

-rat१०p१६.jpg-
२५N९०५९८
गुहागर ः देवघर येथील क्रीडा संकूल.
------
गुहागर क्रीडा संकुलाची दुरवस्था
क्रीडा विभागाची अनास्था; स्पर्धा रस्त्यावर घेण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १० : तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी माजी क्रीडामंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी देवघर येथे क्रीडा संकूल मंजूर करून कामही सुरू झाले; मात्र २०१३ पासून सुरू झालेले हे क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे. या संकुलामध्ये एकही क्रीडाप्रकार खेळवला गेला नसून, जिल्हा क्रीडा विभागाने याकडे पूर्ण पाठ फिरवली आहे.
जिल्हा क्रीडा विभागाकडून सुमारे १ कोटी रुपये निधी खर्च करून उभारण्यात येत असलेले हे क्रीडा संकुल गेली १२ वर्षे उभारण्यात येत आहे. या संकुलाला रंगरंगोटी करण्यात आली होती; परंतु अद्याप उद्‍घाटन झालेले नाही. यामुळे अनेकवेळा क्रीडा स्पर्धा या संकुलाच्या बाजूला घेतल्या जातात. अॅथलेटिक्सच्या स्पर्धा तर गुहागर-चिपळूण मुख्य रस्त्यावर घेण्याची वेळ क्रीडा विभागावर आली होती.
या संकुलावर खर्ची पडलेला निधी जरी सरकारी असला तरी सर्वसामान्यांच्या करातून उभारलेला हा निधी आहे. तालुक्यात एकही क्रीडा संकुल नाही. त्यामुळे गुहागर-चिपळूण या मुख्य मार्गावरील शहरापासून १८ किमी अंतरावर देवघर येथे या संकुलाची घोषणा झाल्यानंतर व प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तालुकावासियांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या

चौकट
बास्केटबॉलचे पॅनल सडले
बहुउपयोगी स्वरूपाच्या बनवण्यात आलेल्या या क्रीडा संकुलामध्ये टेबल टेनिस, हॅण्डबॉल, कॅरम, बुद्धिबळासारख्या खेळाबरोबर जिमखानाही सुरू करण्यात येणार होता; परंतु केवळ इमारत उभी असून याचा उपयोग शून्य आहे. या संकुलाबाहेर बास्केटबॉलसाठी उभारण्यात आलेले पॅनल सडले आहेत. २०० मीटरच्या बनवलेल्या ट्रॅकवर तसेच इमारतीच्या सभोवती गवत व झाडी वाढली आहे.

चौकट
वीजजोडणीही नाही
या संकुलाला गळती लागल्याने वॉटरप्रुफिंग करण्यात आले. प्लम्बिंगचे कामही पूर्ण आहे; परंतु संकुलाला अद्याप वीजजोडणी मिळालेली नाही. दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या तालुका क्रीडा स्पर्धा होतात; परंतु एकही स्पर्धा या संकूलात झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com