बांदा येथे उद्या शेतकऱ्यांची सभा
बांदा येथे उद्या
शेतकऱ्यांची सभा
बांदा ः शेतकरी बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी व त्यांना काजू बोर्ड कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी उद्या (ता. ११) दुपारी ३ वाजता बांदा-गडगेवाडी येथील दूध संस्था कार्यालयात शेतकरी सभा आयोजित केली आहे. अलीकडेच शासनाने जाहीर केलेल्या काजू बोर्ड कार्यकारिणीत केवळ राजकीय नेते व पुढाऱ्यांना स्थान मिळाले असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा विचार केलेला नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकरी प्रतिनिधींना कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी काजू बोर्ड संचालक डॉ. परशराम पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःसोबत किमान तीन ते चार शेतकरी घेऊन सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे; अन्यथा भविष्यात केवळ राजकीय नेत्यांचे निर्णय आपल्यावर लादले जातील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
....................
‘सिंधुदुर्ग राजा’ चरणी
आज वारकरी भजन
कुडाळ ः सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये उद्या (ता. ११) आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्या वतीने देवगड इळये येथील ६० कलावंतांच्या संचात आई महालक्ष्मी प्रासादिक वारकरी दिंडी भजन व कुडाळ येथील ‘स्वरगंधार’ हे कार्यक्रम सादर होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता ‘स्वरगंधार’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम तर, ६ वाजता आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन मंडळाचा दिंडी व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नगरसेवकांच्या वतीने केले आहे.
.....................
मुंबईत ३० ला
‘डाक अदालत’
सिंधुदुर्गनगरी ः मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये १३२ वी डाक अदालत ३० सप्टेंबरला दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभाग अधीक्षक यांनी दिली. पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट काउंटर सेवा, डाक वस्तू पार्सल, बचत बॅंक व मनिऑर्डर याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जीपीओ बिल्डिंग, जीपीओ कॉम्पलेक्स पहिला माळा, मुंबई ४००००१ यांच्या नावे दोन प्रतींसह १९ सप्टेंबरपर्यंत पाठवावी.
.......
मटकाप्रकरणी एकावर
साटेली भेडशीत कारवाई
दोडामार्ग : साटेली-भेडशी खालचा बाजार येथे कल्याण मटक्याचा जुगार खेळवत असलेल्या एका व्यक्तीवर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. अनिकेत बाबू खरवत (वय २४, रा. झरेबांबर, काजूळवाडी) असे संशयिताचे नाव आहे. तो मंगळवारी (ता. ९) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साटेली-भेडशी खालचा बाजार या सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटक्याचे आकडे घेऊन जुगार खेळताना पोलिसांना आढळला. यावेळी त्याच्याकडून रोख रक्कम २७५० रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
......................
पालकमंत्री राणे
आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी ः मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे उद्या (ता. ११) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी एक वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमास (इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोस) उपस्थित राहणार आहेत.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.