पुण्यस्मरण कीर्तन महोत्सव

पुण्यस्मरण कीर्तन महोत्सव

Published on

-rat१०p९.jpg-
२५N९०५८०
शरदबुवा घाग
------
रत्नागिरीत उद्यापासून कीर्तन महोत्सव
रत्नागिरी ः अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळ आणि रत्नागिरी कीर्तनकार मंडळाच्यावतीने पुण्यस्मरण कीर्तन महोत्सव येत्या १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. यामध्ये कीर्तनकार शरदबुवा घाग (नृसिंहवाडी) यांचे कीर्तन दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होईल. त्यांना ऑर्गनसाथ चैतन्य पटवर्धन व हेमंत देशमुख आणि तबलासाथ केदार लिंगायत, पखवाज कैलास दामले करणार आहेत. जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी या कीर्तनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चित्पावन ब्राह्मण मंडळ व कीर्तनकार मंडळाने केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com