-मोकाट गुरांचा वाहनचालकांना त्रास

-मोकाट गुरांचा वाहनचालकांना त्रास

Published on

-rat१०p१८.JPG-
२५N९०६३४
गुहागर ः गुहागर रस्त्यावर बसलेल्या मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
-----
मोकाट गुरांचा वाहनचालकांना त्रास
शृंगारतळी, रानवी, गुहागर मार्ग : अपघातांना निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १० : गुहागर शहरासह शृंगारतळी, रानवी मार्गावरील मोकाट गुरांनी ठिय्या दिला आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.
गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत मोकाट गुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्थानिक प्रशासनानेही यावर अनेक उपाययोजना राबवल्या; मात्र, ते अयशस्वी ठरलेल्या आहेत. कोंडवाडे, गुरेमालकांना दंड असे उपायही करून पाहिले; मात्र, दिवसेंदिवस मोकाट गुरांचा उपद्रव सुरूच आहे. नोटिसा बजावूनही गुरांचे मालक दाद देत नाहीत. शृंगारतळी-गुहागर हा नेहमीचा वर्दळीचा मार्ग आहे. भरधाव वाहने ये-जा करत असतात. अशावेळी दाटीवाटीने रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांना वाहनांची धडक बसते. गुरांना वाचवण्यासाठी तत्काळ ब्रेक दाबल्याने कधी कधी वाहनेही आदळतात.
शृंगारतळी आठवडा बाजारात तर मोकाट गुरांचा मोठा उपद्रव आहे. गुहागर शहरातही मोकाट गुरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रानवी येथे रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात गुरांचा कळप रस्त्याच्या मध्यभागी बसलेला असल्याने वाहने चालवणे कठीण होऊन गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com