जिल्हा नगर वाचनालयास मायदेशचा परिस स्पर्श
rat१०p२५.jpg-
P25N90668
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची नूतन वास्तू अशी दिसेल.
----
जिल्हा नगर वाचनालयास मायदेश फाउंडेशनचा परिसस्पर्श
ॲड. दीपक पटवर्धन ः दीड कोटी उपलब्ध होणार, द्विशताब्दीकडे दिमाखदार वाटचाल
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : द्विशताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर सभागृहाचे काम प्रगतिपथावर आहे. आता पुणेस्थित अरूण जोशी यांच्या मायदेश फाउंडेशनचा आर्थिक परिसस्पर्श लाभणार आहे. त्यांच्याकडून दीड कोटी रक्कम मिळणार असल्याने हा इमारत प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे तसेच वाचनालयाचा चेहरामोहरा बदलण्यास त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
मायदेश फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक अरुण जोशी व त्यांचे काही सहकारी संचालक ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वाचनालयाच्या तळमजल्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. वाचनालयाला १२ हजार चौ. फुटाचा एफएसआय वापरून दुमजली बांधकामाची परवानगी आहे. आजपर्यंत १ कोटी ५० लाखांच्या आसपास काम झाले आहे; मात्र प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अधिकच्या निधीची आवश्यकता होती. जोशी यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी वाचनालयाची माहिती घेतली, तपशीलवार चर्चा केली. ते फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रवादाशी निगडित, जुन्या, ऐतिहासिक संस्था, कलात्मक, शैक्षणिक क्षेत्रात मदत करतात. मायदेशच्या संचालक मंडळावर प्रतिथयश व्यावसायिक असामी आहेत, असे अॅड. पटवर्धन म्हणाले.
त्यांनी सांगितले की, वाचनालयात डिजिटल लायब्ररी मायदेश डिजिटल लायब्ररी नावाने उभी करणे, दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन, वाचनालयात होणाऱ्या सभागृहाचे संपूर्ण अद्ययावत करणे, स्वा. सावरकर कम्युनिटी सेंटर उभारणी, दुसऱ्या मजल्यावर शेड उभारून त्यावर सौरपॅनल लावून संपूर्ण वाचनालय सौरशक्तीवर नेणे, लिफ्ट, आवाराचे सुशोभीकरण करणे आदी रचनात्मक कामे मायदेशच्या मदतीतून होतील. तसेच वाचनालयाच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘मायदेश फाउंडेशन’ करणार आहे.
चौकट १
संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास जाणार
वाचनालयाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाणार आहे. गेली ३० वर्षे वाचनालय उभे करण्यासाठी ग्रंथसंपदा जतन करत ३० वर्षांचे लीज मंजूर करून घेऊन इमारतीचे काम नव्याने सुरू करण्याची मजल मारताना केलेल्या अथक प्रयत्नानंतर मायदेश फाउंडेशनचा वरदहस्त प्राप्त झाल्याने आता वाचनालयाचा संपूर्ण प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण होईल, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
चौकट
‘मायदेश’ विषयी...
भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव टिकून ठेवत नूतनीकरणासाठी मायदेश फाउंडेशन समर्पित वृत्तीने कार्यरत आहे. यापूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळाचे (पुणे) नूतनीकरण, स्वा. सावरकर सेवा केंद्र (विलेपार्ले) हे नव्या बहुआयामी स्वरूपात मायदेशने विकसित केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा पुरवणे, पेशवेकालीन शंकर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.