क्राईम
रेल्वेतून पडून
तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर उक्षी ते भोके दरम्यान ट्रॅकवर लोहमार्ग पोलिसांना जखमी अवस्थेत अनोळखी तरुण आढळळा. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी (ता. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोके रेल्वेस्टेशन येथील स्टेशनमास्तर यांनी रत्नागिरी येथील ठाणे अंमलदार यांना फोनद्वारे उक्षी ते भोके रेल्वेस्टेशनदरम्यान बोगद्यामध्ये एक अनोळखी तरुण जखमी अवस्थेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जखमी अवस्थेत अनोळखी तरुण आढळला (नाव-गाव माहित नाही) अंदाजे वय ३५ आहे. हा कोणत्यातरी रेल्वेमधून पडून त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूपासून डोळ्यापर्यंत दुखापत झालेली होती. तत्काळ त्याला रत्नागिरी रेल्वेस्टेशनला आणून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन रिक्षाचालकावर गुन्हा
रत्नागिरी ः ओणी ते कोल्हापूर जाणाऱ्या रायपाटण गाव येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भालचंद्र नारकर (५३, रा. पाचल, नारकरवाडी, राजापूर) व अविनाश शंकर तोडकरी (वय ५१, रा. रायपाटण सनगरवाडी, ता. राजापूर) अशी संशयित वाहनचालकांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता.९) दुपारी साडेचार ते सव्वापाचच्या सुमारास ओणी ते कोल्हापूर जाणाऱ्या रायपाटण गावातील रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वाहनचालक सुनील नारकर यांनी रिक्षा रायपाटण येथील वडचाई गॅरेज रस्त्यावर तर अविनाश तोडकरी यांनी रिक्षा या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, अशा पार्क केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रामदास पाटील व रामकृष्ण कात्रे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.