स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राजकीय मुत्सद्देगिरी अवलंबली

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राजकीय मुत्सद्देगिरी अवलंबली

Published on

- rat११p७.jpg-
२५N९०७६१
राजापूर ः राजापूर नगर वाचनालयात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ या विषयावर व्याख्यान देताना शरद पोंक्षे.
---
स्वा. सावरकरांनी राजकीय मुत्सद्देगिरी अवलंबली
शरद पोंक्षे ः राजापूरमध्ये नगर वाचनालयातर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः जे देशाचा इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बिघडतो. त्यामुळे आपण सर्वांनी खरा इतिहास वाचला पाहिजे आणि तो पुढील पिढीला सांगितला पाहिजे. छत्रपती शिवरायांना गुरुस्थानी मानून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी युद्धनीती आणि राजकीय मुत्सद्देगिरी अवलंबली होती, असे प्रतिपादन अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
राजापूर नगर वाचनालयाच्यावतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ या विषयावर पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नगर वाचनालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पोंक्षे यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राचे विविध पैलू उलगडले. या वेळी ते म्हणाले, भारत विकसित राष्ट्र कधीच व्हायला हवे होते; मात्र ते झालेले नाही. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार, भारतीय तरुणांना सैनिकीकरणाचा विचार, भारतातील लोकशाही कशा पद्धतीने प्रस्थापित केली पाहिजे याच्या पाठीमागचा विचार सर्व जातीच्या भिंती संपून एकजूट समाज म्हणून भारत कसा उभा राहील याबद्दल मांडलेल्या विचारांना ६० वर्षांत काँग्रेसच्या हाती असलेल्या सत्ताधाऱ्यांनी कचऱ्‍याची टोपली दाखवली होती. जोपर्यंत हिंदू समाज एक होत नाही तोपर्यंत बहुसंख्याकांचा विचार कोणी करणार नाही. यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन धर्मावरील आघात रोखण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर आणि पाचशे विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या करण्यात आल्या. हा इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पोंक्षे यांनी चातुर्वर्ण्य, स्वातंत्र्यपूर्वकाळातील हिंदू समाजाची स्थिती, स्वातंत्र्यानंतरची स्थिती, सावरकरांचे कार्य आणि त्यांचे विविध पैलू आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडले. तत्पूर्वी, वाचनालयाच्यावतीने अध्यक्ष प्रभात पाध्ये यांच्या हस्ते पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट
जात निर्मूलनाचे काम विसरू नका
एकवेळ मायभूमीसाठी स्वा. सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी विसरलात तरी चालेल; परंतु १९२४ ते १९३७ हा कालखंड विसरू नका. या १३ वर्षात सावरकरांनी जातनिर्मुलनाचे केलेले काम कधीही विसरू नका. हिंदू समाज एक व्हावा म्हणून त्यांनी कष्ट घेतले आहेत, असे पोंक्षे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com