-चिपळूण-पोफळी मार्ग प्रवासासाठी धोकादायक

-चिपळूण-पोफळी मार्ग प्रवासासाठी धोकादायक

Published on

- rat११p३.jpg -
२५N९०७५७
चिपळूण ः पिंपळी येथील अरुंद पूल.
---
चिपळूण-पोफळी मार्ग ‘मृत्यूचा सापळा’
अरुंद पूल; वेगवान वाहनांना आवरणे कठीण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः चिपळूण तालुक्यातील पोफळी-चिपळूण मार्ग प्राणघातक ठरला आहे. या मार्गावर महिन्यात किमान एक अपघात ठरलेला आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळी येथे गेल्या महिन्यात झालेल्या तिहेरी अपघातात पाचजणांचा एकाचवेळी मृत्यू झाला. या ठिकाणच्या पुलाचे शासनाने रूंदीकरण केले असते तर हा अपघात झाला नसता आणि पाचजणांचा जीव वाचला असता, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात १९ ऑगस्टला रात्री पिंपळी अवजल कालव्यावर तिहेरी अपघात झाला. अपघातग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता बहादूरशेख नाक्यापासून पिंपळी मोहल्ल्यापर्यंत सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. जागा मिळाली त्या ठिकाणी रस्त्याची रूंदी वाढवण्यात आली आहे; मात्र या रस्त्यावरचे दोन्ही पूल अजूनही अरुंद आहेत. ते धोकादायक स्थितीत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंद असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहने वेगाने येतात. पुलावरून एकावेळी एकच वाहन मार्गस्थ होऊ शकते. त्यामुळे पुलापर्यंत आल्यानंतर वेगावर नियंत्रण करावे लागते. दोन्ही पुलावर विजेची व्यवस्था नाही. एखाद्या वाहनचालकाला त्याच्या ताब्यातील वाहनावर नियंत्रण करता आले नाही तर अपघात ठरलेला असतो. दोन्ही पुलामधील रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या महिन्यात तीन वाहनांचा पुलावर अपघात झाला तेथे बाजू काढण्यासाठी जागा असती तर हा अपघात झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नव्याने झालेल्या या राष्ट्रीय महामार्गावर गंभीर अपघाताचे प्रमाण जास्त आहे.
---
अपघाताचे कारण
* रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली.
* सिमेंट काँक्रिट केलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नाही
* बहादूरशेख नाका वगळता कुठेही वाहतूक नियंत्रण व्यवस्था नाही

चौकट
अतिक्रमणे, खड्ड्यांमुळे प्रवास असुरक्षित
बहादूरशेख नाक्यापासून पिंपळीपर्यंत रस्त्यालगत अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्यालगतचे फूटपाथ, रस्त्यांची बाजू, चौक हे दुकानदारांनी आणि राजकीय पाठबळ असलेल्या अतिक्रमणांनी व्यापले आहेत. डांबरी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर सुरक्षेचा अभाव आहे. हॉस्पिटल, शाळा, बाजार, चौक येथे झेब्रा क्रॉसिंग नाहीत.
---
कोट
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणच्या हद्दीत अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ वाढले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण करून १५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. ठेकेदाराचे दायित्व संपत आले तरी अजून पुलाची दुरुस्ती झालेली नाही. अपघातांच्या ठिकाणी ना स्पीडब्रेकर, ना सिग्नल, अंधारी वळणे, चुकीच्या बाजूने चालणारी वाहने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
--विराज कदम, खडपोली, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com