कुवारबाव ते टिआरपी मार्ग धुळीच्या विळख्यात
-rat११p२१.jpg, rat११p२२.jpg-
२५N९०८२९, २५N९०८३०
रत्नागिरी ः कुवारबाव ते टीआरपी मार्गावर एसटी, ट्रक गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक, पादचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.
----------
कुवारबाव ते टीआरपी मार्ग बनला धुळीचा
वाहनचालकांसह नागरिकांना त्रास; उपाययोजनांकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या रत्नागिरी शहराजवळील टीआरपी, कुवारबाव, मिरजोळे, रेल्वेस्टेशन फाटा या परिसरात महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तेथील नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, ठेकेदाराने धूळ कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत काही भाग सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत आहे; मात्र, वाहतुकीसाठी जुनाच रस्ता वापरला जात आहे. त्यावरून अवजड वाहने व रस्तेकामासाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री नेणारी वाहने ये-जा करत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे माती सुकलेली आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून, शेजारील निवासी वस्त्या, दुकानदार यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळाही असल्याने विद्यार्थ्यांनाही धुळीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. धूळ कमी करण्यासाठी दिवसातून किमान तीन ते चारवेळा पाणी मारणे आवश्यक असून, व्यापारी संघटनेने या संदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार सूचना दिल्या आहेत. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. भविष्यात प्रदूषण व आरोग्यविषयक समस्यांना आळा घालण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि ठेकेदार लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
----
कोट
रत्नागिरीचा ‘विकास’ खड्डे आणि धुळीच्या रूपाने सर्वत्र दिसत आहे. महामार्गावरील रस्त्यांची कामे वेळेत झाली तर धुळीचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. पाऊस थांबल्यामुळे धुळीचा त्रास भविष्यात वाढणार आहे. त्यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराने योग्य काळजी घ्यावी.
- प्रसाद सावंत, ठाकरे शिवसेना
--------
चौकट
जयस्तंभ-माळनाका मार्गवरही त्रास
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते माळनाका या रस्त्यावरही धुळीचे साम्राज्य आहे. या मार्गावरील एका बाजूचे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून, सर्वत्र खडी वर आली असून खालील रस्ता दिसू लागला आहे. त्यामुळे खड्डेही पडले आहेत. ट्रक, एसटी, मोटार गेल्यानंतर उडणारी धूळ पादचारी, दुचाकीस्वारांच्या डोळ्यात आणि अंगावर उडत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. नगरपालिका आणि लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.