कोकण
सुहास काडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
-rat११p१३.jpg-
P२५N९०८०९
सुहास काडगे
-------
सुहास काडगे यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
राजापूर, ता. ११ ः शहरातील जिल्हा परिषदेच्या गोखले कन्याशाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक सुहास काडगे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारा यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून २९ वर्षे सेवा बजावलेले काडगे मे २०२३ पासून गोखले कन्याशाळेत कार्यरत आहेत. सहकारी शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये १२ असलेला प्रशालेचा पट १०५ पर्यंत नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. परसबाग निर्मिती, गांडूळखत, कंपोस्ट खतनिर्मिती, केळी लागवड, कात्रणसंग्रह असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले.