क्राईम

क्राईम

Published on

‘त्या’ खलाशांचा मृतदेह सापडला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा येथील अमिना-आयशा नावाची बोट भगवती किल्ला येथे समुद्राच्या पाण्याच्या लाटेच्या तडाख्याने बुडाली होती. बोटीवरील आठ खलाशी होते. त्यातील सहा जण बचावले होते; मात्र दोन खलाशी समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. त्यातील एकाचा पांढरा समुद्र येथे मृतदेह सापडला. दुसऱ्या खलाशाचा मृतदेह चार दिवसांनी भगवती किल्ल्याजवळील ब्रेकवॉटरसमोरील पाण्यात आढळला. ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. अमिना-आयशा ही बोट दुपारी साडेचारच्या सुमारास मिरकरवाडा बंदरातून वायंगणी समुद्राच्या पाण्यात मासेमारीसाठी गेली होती. यामध्ये आठ खलाशी होते. मासेमारी करून मिरकरवाडा जेटी येथे येत असताना भगवती किल्ला-ब्रेकवॉटरचे टोकावर एका मोठ्या लाटेमुळे बोट उलटली. बोटीवरील आठ खलाश्यांपैकी ६ जण वाचले होते. दोन खलाशी विनोद हिरू धुरी (वय ६३, रा. मांडवी बंदररोड, रत्नागिरी) व अनामुल इस्लाम तालुकदार (वय २५) हे दोघे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. पोलिसांकडून खलाश्यांचा शोध सुरू असताना विनोद धुरी यांचा मृतदेह पांढरा समुद्र येथे सापडला होता. मंगळवारी (ता. ९) चार दिवसाने अनामुल तालुकदार याचा मृतदेह भगवती किल्ला येथील ब्रेकवॉटर येथे तरंगताना आढळला. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.


खूनप्रकरणी तिघांना
न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी ः मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकर खूनप्रकरणातील तीन संशयितांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दुर्वास दर्शन पाटील (२६, रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी), विश्वास विजय पवार (४१, रा कळझोंडी, रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (४०, रा. आदर्शनगर, वाटद खंडाळा) अशी संशयितांची नावे आहेत. या आधी पोलिसांनी त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. गुरूवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. ही घटना १७ ऑगस्टला घडली होती. २१ ऑगस्टला भक्ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात संशयिताने प्रेमसंबंधातून भक्ती मयेकर हिचा गळा आवळून खून करून मृतदेह आंबाघाटाच्या दरीत फेकून दिल्याचे पुढे आले होते तसेच संशयिताच्या चौकशीत आणखी दोन खून केल्याचे कबूल केले होते. पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com