
-rat११p२९.jpg-
P२५N९०९१६
खेड ः संरक्षक भिंतीवर धडकल्याने मोटारीची झालेली दुरवस्था.
--------
मोटार भिंतीवर धडकून एक ठार
भोगावजवळ अपघात ; पाचजण जखमी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी मोटार संरक्षक भिंतीवर धडकून अपघात झाला. यामध्ये एकजण ठार, तर अन्य पाचजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता. ११) पहाटे सव्वातीनच्या सुमारास झाला. मृतासह अन्य पाच जखमी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने लिंगप्पा कटप्पा पातारे (वय २८, रा. निगडी पुणे) हे मोटारीने जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे भोगाव पुलावरील कठड्यावर मोटार आदळली. या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५, रा. चहोली, ता. हवेली, जि. पुणे) हे जागीच ठार झाले, तर धनराज प्रभाकर मगर (वय ४२), विकास शंकर चव्हाण (१८), मोहन गोरोबा चव्हाण (४२), नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे (३५, सर्व रा. पुणे), वाहनचालक लिंगप्पा कंटप्पा पातारे (२८) हे सर्व जखमी झाले आहेत. यापैकी गंभीर दुखापत झालेल्या तिघांना खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, तर दोन किरकोळ जखमी प्रवाशांवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.