संगीत भजन स्पर्धेत ब्राह्मणदेव मंडळ प्रथम
- rat१२p९.jpg-
25N91063
लांजा ः भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्यावतीने आयोजित खुल्या गटातील संगीत भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाचा गौरव करताना प्रमुख पदाधिकारी.
संगीत भजनात ब्राह्मणदेव मंडळ प्रथम
भांबेड येथे आयोजन; जिल्ह्यातील सहा संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १२ ः भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्यावतीने आयोजित खुल्या गटातील संगीत भजन स्पर्धेत राजापूर तालुक्यातील उपळे कदमवाडी येथील श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
भांबेड पेठदेव येथील मंडळाचा ४४वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात झाला. या निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते तसेच खुल्या संगीत भजन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये जिल्ह्यातून ६ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण परशुराम गुरव व नारायण मिरजुळेकर यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांकप्राप्त श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, उपळे कदमवाडी यांना रोख रुपये १० हजार, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक जय हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ, गावमळा ता. संगमेश्वर यांस रोख ७ हजार व चषक प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तळवडे (ता. राजापूर) याला पाच हजार रुपये व चषक देण्यात आला तसेच उत्कृष्ट पखवाज राघव संतोष चव्हाण, उत्कृष्ट कोरस श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ (काटवली सुतारवाडी, ता. संगमेश्वर), उत्कृष्ट गायक स्वरूपा पाटणकर यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड पेठदेव येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.