फिजिओथेरपी म्हणजे नवजीवनाचे कार्य

फिजिओथेरपी म्हणजे नवजीवनाचे कार्य

Published on

swt125.jpg
91039
कुडाळ ः बॅरिस्टर नाथ पै महाविद्यालयात फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. राजू सातोसकर. (छायाचित्र ः अजय सावंत)

फिजिओथेरपी म्हणजे नवजीवनाचे कार्य
डॉ. राजू सातोस्करः नेरूर येथील महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ः फिजिओथेरपी ही केवळ व्यावसायिक उपचारपद्धती नसून करुणा, समर्पण आणि मानवी मूल्य जपत रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य आहे. शस्त्रक्रियेनंतर शरीररचना सुधारली तरी त्या शरीराची कार्यक्षमता पुन्हा मिळवून देण्याचे मोठे काम फिजिओथेरपी करते, असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. राजू सातोस्कर यांनी केले.
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त नेरूर येथील (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रातील बॅ. फिजिओथेरपी महाविद्यालयात कार्यक्रमात आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘आजच्या युगात सर्जन आणि फिजिओथेरपिस्ट एकत्रितपणे कार्य करतात. भविष्यात फिजिओथेरपीचे महत्त्व अधिक वाढणार आहे. सर्जन कितीही यशस्वी शस्त्रक्रिया करीत असला तरी रुग्णाला पुन्हा चालता-बोलता करण्यासाठी फिजिओथेरपी अनिवार्य आहे. तसेच वयोमानानुसार शरीरात नैसर्गिक बदल होत असतात, हालचाली कमी होतात, अशावेळी फिजिओथेरपीची मदत अत्यावश्यक ठरते.’’
यावेळी त्यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने कुडाळसारख्या शहरात फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करून रुग्णांना अत्याधुनिक मशीन्स, यंत्रणा, सुविधा व सेवांची उपलब्धता करून दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला चेअरमन उमेश गाळवणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, डॉ. ज्योती रंजन पलटासिंग, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी, जी. एस. वेदांग चव्हाण, स्पोर्ट सेक्रेटरी स्नेहा वाडकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, पल्लवी कामत आदी उपस्थित होते.
श्री. गाळवणकर म्हणाले, ‘‘फिजिओथेरपी महाविद्यालय हे व्यावसायिक हेतूपेक्षा लोककल्याणासाठी सुरू करण्यात आले आहे. लोकांना वेदनामुक्त करण्यासाठी आणि समाजोपयोगी आरोग्य उपक्रम राबविण्यासाठी या महाविद्यालयाने कार्य करावे हीच अपेक्षा आहे.’’
सूत्रसंचालन साईश कोथरकर व वैष्णवी परब यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com