वेंगुर्ले-सातार्डा बससेवा ठप्प
वेंगुर्ले-सातार्डा
बससेवा ठप्प
सावंतवाडी ः वेंगुर्ले-सातार्डा बस फेरी दोन दिवस बंद असल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. वेंगुर्ले आगारातील ढिसाळ नियोजनामुळे बस सेवा ठप्प झाली असून, उपसरपंच हेमंत मराठे यांनी तात्काळ बस फेरी पूर्ववत करण्याचा इशारा दिला आहे. ही बस शालेय मुले, कॉलेज विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांसाठी महत्वाची आहे.
-------------
सावंतवाडी येथे
चित्रकला स्पर्धा
सावंतवाडी ः येथील स्नेह नागरी सहकारी पतसंस्था आणि रोटरी क्लबतर्फे रविवारी (ता.१४) कळसुलकर हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्युनिअर केजी/शिशु वर्गासाठी रंग भरून चित्रकला करावी लागेल, तर वरिष्ठ केजी/बालवाडी व पहिली-चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार (प्राणी, पक्षी, निसर्ग, स्वच्छता) चित्र काढावे लागेल. कागद आयोजकांकडून दिला जाईल, इतर साहित्य स्वतः आणावे लागेल.
-----------
बांदिवडे येथे
हरिनाम सप्ताह
मालवण ः बांदिवडे येथील लखमेश्वर मंदिरात ११ सप्टेंबरपासून हरिनाम सप्ताह सुरू झाला असून तो १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या सप्ताहात पंचक्रोशीतील भजन मंडळे भजन सेवा देतील, तसेच आकर्षक चित्ररथ व गोफ नृत्याची कार्यक्रमरचना असेल.
------------
‘सावंतवाडी’त
पोलिसांची गस्त
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी सावंतवाडी शहराच्या चारही सीमांवर पोलिसांची तपासणी सुरू आहे. संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवले जात असून, अवैध दारू वाहतूक, मटका-जुगार व चोरीसंदर्भातील कारवायांवर नियंत्रण ठेवले जात आहे. गस्त सकाळी, सायंकाळी आणि रात्री चालवली जात आहे.