सावंतवाडी शहरात कुत्र्यांचा उपद्रव

सावंतवाडी शहरात कुत्र्यांचा उपद्रव

Published on

सावंतवाडीत १७ ला
पाणी पुरवठा बंद
सावंतवाडी ः येथील पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चिवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकीचे बुधवारी (ता.१७) साफ करण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे या टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरकोंडपर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाचेबाग, सुवर्णकॉलनी, बिरोडकर टेंब, डोंगरे पानंद, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाठ, कामतलाईन, रसाळ पानंद, तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, बजरवाडी, नाडकर्णी पानंद, जेल परिसर, जगन्नाथ भोसले उद्यान मागील भाग, शिल्पग्राम परिसर, धमविहार कॉलनी या भागांमध्ये पाणी पुरवठा १७ व १८ ला बंद राहील, तसेच त्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल, याची नोंद घ्यावी.
--------
सावंतवाडी शहरात
कुत्र्यांचा उपद्रव
सावंतवाडी ः शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने लहान मुलांवर हल्ले आणि त्यांच्या पाठलागाचे प्रकार वाढले आहेत. याबाबत ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी पालिका प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर कुत्रे पकडून थेट पालिकेच्या कार्यालयात सोडले जाईल, असा इशारा दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com