कळंबा गॅस स्फोट प्रकरण
९११८४
कळंबा गॅस स्फोटप्रकरणी
कर्मचाऱ्याला अटक
जोडणीवेळी हलगर्जीचा ठपका; अन्य तिघांचा शोध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः कळंबा कारागृहाच्या पिछाडीस असलेल्या मनोरमा कॉलनीत भूमिगत गॅस पाईप लाईन जोडणीदरम्यान झालेल्या स्फोटात मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवणे (ता. संगमेश्र्वर) येथील भोजणे कुटुंबातील तिघांचा बळी गेला. भोजणे यांच्या घरी जोडलेल्या गॅस पाईप लाईनला एन्डकॅप लावला नसल्याने गॅस गळती झाल्याचे तपासात समोर आले. या कामाचा ठेका घेतलेल्या सतीमाता कंन्ट्रक्शन कंपनीचा कर्मचारी महमंदहुजेर हबीबुररेहमान हुजेरअली (३५, रा. उत्तर प्रदेश) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ही जोडणी करताना त्याच्याकडून हलगर्जीपणा झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मनोरमा कॉलनी येथे भूमिगत गॅसपाईप लाईन जोडणी २५ ऑगस्टला केली. अमर भोजणे यांच्या किचनपर्यंत ही जोडणी केली. मात्र किचन कट्ट्यावर काढलेल्या पाईपला एन्डकॅप लावली नव्हती. काम आटोपून संशयित महंमदहुजेर परतला होता. दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास भोजणे यांच्या घरात गॅस गळतीने स्फोट झाला. स्फोटातील जखमी शीतल भोजणे, अनंत भोजणे, प्रज्वल भोजणे (सर्व मूळ रा. भोजनेवाडी- शिवणे, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला; तर इशिका भोजणे हिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी चौकशीनंतर गुरुवारी (ता. ११) गॅस पाईपलाईन जोडणीच्या कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एच.पी. गॅस कंपनीचा कोल्हापूर विभागप्रमुख गौरव गुणानंद भट (वय ३४, रा. डेहराडून, उत्तराखंड), कामाची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या इडिलिप्स इंजिनिअरीग ग्लोबल प्रा. लि. कंपनीचा अभियंता हरीष दादासाहेब नाईक (३१, रा. पोखले, ता. पन्हाळा), ठेकेदार सतीमाता कंन्ट्रक्शनचा मालक अमोल जाधव (पर्वती, पुणे) व काम करणाऱ्या महंमदहुजेर हबीबुररहमान हुजेरअली (गुन्नोर, जि. संभल, उत्तरप्रदेश) यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.