-संक्षिप्त
-rat१३p५.jpg-
२५N९१२४२
रत्नागिरी ः बसणी येथील शेट्ये हायस्कूलच्या सभागृह नूतनीकरणासाठी धनादेश मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करताना सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जयवंत कदम.
----
‘जीएम शेट्ये’च्या सभागृहासाठी धनादेश
रत्नागिरी ः शहरानजीकच्या बसणी येथील जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक जयवंत कदम यांनी बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलच्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आई-वडिलांच्या स्मरणार्थ पाच हजाराचा धनादेश मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. या वेळी मुख्याध्यापक पांडुरंग नाईक, साहाय्यक शिक्षक नवनाथ जाधव, शिक्षिका अपूर्वा भाताडे, सायली मयेकर, श्रुतिका जाधव, लिपिक सागर शेटये व सेविका तेजल भोसले आदी उपस्थित होते.
कलावंत मानधन योजनेच्या
जिल्हा समितीवर अमोल रेडीज
लांजा ः राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या रत्नागिरी जिल्हा निवड समितीवर लांजा तालुक्यातील दिग्दर्शक अमोल रेडीज यांची निवड झाली आहे. रेडीज हे उत्तम रंगकर्मी, लेखक, कवी, वक्ते असून त्यांनी एकांकिका, व्यावसायिक व राज्यनाट्य स्पर्धा यांसह मराठी चित्रपट, शॉर्टफिल्म, वेबसीरिज अशा माध्यमातून दर्जेदार अभिनय साकारला आहे. जिल्ह्याच्या कलावंतांसाठी त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
संगमेश्वर व्यापाऱ्यांकडून पोलिसांप्रति कृतज्ञता
संगमेश्वर ः संगमेश्वर व्यापारीसंघातर्फे संगमेश्वर पोलिस निरीक्षक, सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचे आभार मानण्यात आले. गणेशोत्सव काळात वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन, कायदा व सुव्यवस्थेची उत्तम अंमलबजावणी, मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना केल्यामुळे पोलिसदलाचे कौतुक होत आहे. या वेळी व्यापारीसंघाचे अध्यक्ष प्रमोद भिंगार्डे, सचिव अनिल भिडे, खजिनदार अभय गद्रे, उपाध्यक्ष सुशांत कोळवणकर, दिलीप रहाटे, राजेश नारकर, विवेक शेट्ये, नील खातू, जयकांत पटेल आणि पोलिस पाटील अंगरज कोळवणकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.