दारू वाहतुकीत पुण्यातील तिघे ताब्यात
91248
दारू वाहतुकीत पुण्यातील तिघे ताब्यात
विलवडेत कारवाई; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुण्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशाल शिवाजी वाबळे (वय २५, रा. कारखेल, ता. बारामती), गौरव किरण रणधीर (वय २६, रा. वरवंड, ता. दौंड) व साहिल अशोक लोंढे (वय २३, रा. हिंगनिगाडा, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास विलवडे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बांदा पोलिसांनी केली.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास विलवडे येथे पोलिसांना एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून (एमएच १२ पीएच ९९४४) बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. तपासणी केली असता मोटारीत विविध ब्रँडचा गोवा बनावटीचा दारूचा मोठा साठा आढळला. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूमध्ये विविध ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे. या दारूची एकूण किंमत सुमारे १ लाख ५० हजार ८२० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोटारीसह एकूण सुमारे १६ लाख १५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
---
कारवाईतील शिलेदार
दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, पोलिस हवालदार सिद्धार्थ माळकर, पोलिस हवालदार चालक सखाराम परब, पोलिस कॉन्स्टेबल नेल्सन फर्नांडिस यांनी केली. पुढील तपास बांदा पोलिस ठाण्याचे हवालदार बी. एन. तेली करत आहेत.