पणदूर येथे ‘एचआयव्ही’बाबत जागृती

पणदूर येथे ‘एचआयव्ही’बाबत जागृती

Published on

91408

पणदूर येथे ‘एचआयव्ही’बाबत जागृती
कुडाळ ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग आणि एलसीटीसी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने इंटेन्सिफाईड अवेअरनेस कॅम्पेन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही/एड्स जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘एलसीटीसी’चे समन्वयक मानसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना एड्स या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स होण्याची कारणे, त्याचा संसर्ग कसा होतो, तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या उपचार सुविधा यांची माहिती दिली. एड्स संदर्भात समाजामध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांमध्ये योग्य ज्ञान रुजल्यास भविष्यात एड्सचा धोका कमी करता येईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह प्र. प्राचार्य राजेंद्र पवार, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. धोंडू गावडे आदी उपस्थित होते. प्रा. गावडे यांनी पाटील यांना धन्यवाद दिले.
...................
91409

चेंदवण हायस्कूलमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी
कुडाळ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी उपसरपंच रश्मी नाईक यांनी चेंदवण हायस्कूल येथे काढले. कुडाळ इनरव्हील क्लबकडून ‘सक्षम विद्यार्थी, सक्षम भारत’ करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत चेंदवण हायस्कूलमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी आयोजित करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. चेंदवण हायस्कूल स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन देवेंद्र नाईक, माऊली देवस्थान उपसमिती अध्यक्ष संजय परब, मुख्याध्यापक माणिकराव पवार, शिक्षक श्री. नाईक, संतोष सांगळे, सौ. गवस उपस्थित होते. चेंदवण हायस्कूलमधील २० विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र नाईक, रश्मी नाईक यांनी विशेष सहकार्य केले. मुख्याध्यापक पवार यांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com