काँग्रेसने केलेल्या विधानाचा
सावंतवाडी भाजपकडून निषेध

काँग्रेसने केलेल्या विधानाचा सावंतवाडी भाजपकडून निषेध

Published on

91530

काँग्रेसने केलेल्या विधानाचा
सावंतवाडी भाजपकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीबाबत काँग्रेसने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा सावंतवाडी भाजपकडून तीव्र निषेध करण्यात आला. ‘मातृशक्तीचा सन्मान’ या शीर्षकाखाली आयोजित आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविरोधात आवाज उठवला. यावेळी देशातील सर्व मातृशक्तीचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत आईला सर्वोच्च स्थान असल्याचे सांगत भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी काँग्रेसच्या विधानाचा निषेध केला. त्या म्हणाल्या, ‘‘पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरी ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या मातोश्रीबाबत अपशब्द वापरणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर देशातील मातृशक्तीचा अपमान आहे. बिहार निवडणुकीतील प्रचारादरम्यान काँग्रेसने द्वेष पसरवत मातृशक्तीचा अपमान केला. आईचा सन्मान करणे हे भारतीय संस्कृतीचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडू.’’ या निषेध आंदोलनात भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा चिटणीस महेश धुरी व सुधीर दळवी, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस, महिला मोर्चाच्या मोहीनी मडगांवकर, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, चेतना रजपूत, मेघना साळगांवकर, दिपाली भालेकर, सुनयना काटकर, प्राजक्ता केळुसकर, मेघा भोगटे, वंदना किनळेकर, समिधा नाईक, सावित्री पालेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com