नारळ-सुपारी नुकसान पाहणीसाठी कृषी विभाग बांधावर

नारळ-सुपारी नुकसान पाहणीसाठी कृषी विभाग बांधावर

Published on

91539

नारळ-सुपारी नुकसान पाहणीसाठी कृषी विभाग बांधावर

बांद्यात पथक दाखल; पंचनाम्यासाठी कल्याणकरांनी वेधले होते लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे नारळ-सुपारी बागांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाची टीम आज बांदा येथे दाखल झाली.
या पाहणीसाठी सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, उपकृषी अधिकारी अजुमुद्दीन सरगुरु व सौ. मनाली परब, सहायक कृषी अधिकारी पुनम देसाई, रसिका वसकर, मिलिंद निकम आदी अधिकारी उपस्थित होते. या टीमने बांदा तसेच दशक्रोशीतील राजेंद्र सावंत, दिनेश देसाई, सदाशिव मोर्ये, महादेव वसकर, शरद सावंत, चंद्रकांत भिसे, भरत सावंत, आत्माराम बुस्कुटे, रामा सावंत, गजानन सावंत, लक्ष्मण सावंत, आत्माराम सावंत आदी शेतकऱ्यांच्या नारळ-सुपारीच्या बागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे मान्य करून यासंदर्भातील सकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे अधिकारी वर्गाने स्पष्ट केले. तात्काळ पाहणी झाल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, याबाबत योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही पुढे करण्यात आली आहे. या संदर्भात श्री. कल्याणकर यांनी, हा प्रश्न केवळ बांदा दशक्रोशीपुरता मर्यादित नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारळ-सुपारी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे केवळ पाहणी व आश्वासन न देता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तरच जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी पुन्हा उभा राहू शकतील. यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे लवकरच मागणी करण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com