राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलपदी खांचे

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलपदी खांचे

Published on

राष्ट्रवादी अल्पसंख्याक
सेल समन्वयकपदी खांचे
सावर्डे ः राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा कार्यकारिणी व समन्वयकपदी तबस्सूम खांचे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी महिला राज्य उपाध्यक्षा व माजी सभापती पूजा निकम, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे आदी उपस्थित होते. खांचे या पाटगाव ग्रामपंचायत सदस्या आहेत.

पीकपाहणी
नोंदणीसाठी मुदतवाढ
रत्नागिरी ः खरीप हंगाम २०२५ साठी पिकांची नोंद पीकपाहणी डीसीएस मोबाईल अॕप्लिकेशनमध्ये ऑनलाइन पद्धतीने करण्याकरिता शेतकरीस्तरावरील कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत होता. नोंदणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणामुळे शेतकरी पिकाची नोंद करण्यापासून वंचित राहू नये याकरिता ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी कळवले आहे. पीकपाहणी हा शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्या द्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती स्वतः डिजिटल पद्धतीने नोंद करता येते. या प्रणालीमुळे पिकांची अचूक माहिती सरकारकडे जमा होते, ज्यामुळे शेतीविषयक योजना, पीकविमा योजना आणि इतर शासकीय अनुदानासाठी याचा उपयोग होतो. पीकविमा योजनेत सहभाग, पिककर्ज, शासकीय भात खरेदी-विक्री व शासनाच्या इतर योजनेकरिता पीकपाहणी करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी पीकपाहणी डीसीएस मोबाईल अॕप्लिकेशनमध्ये ऑनलाइन पद्धतीने पिकांची नोंद करावी.


नानल गुरुकुलामध्ये
स्वयंशासन दिन साजरा
रत्नागिरी : नानल गुरुकुलामध्ये शिक्षकदिन स्वयंशासन दिन म्हणून साजरा केला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुकुलामधील शिक्षकांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववी या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी आयुष्यामध्ये शिक्षकाचे महत्त्व किती आहे, हे मुलांना या निमित्ताने पटवून दिले. विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक बनलेला चैतन्य व मीरा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अभिजित गोडबोले, गुरूकुलप्रमुख किरण सनगरे व गुरूकुलचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com