सावर्डे बाजारपेठेतील खड्ड्यावर मलमपट्टी

सावर्डे बाजारपेठेतील खड्ड्यावर मलमपट्टी

Published on

-rat१५p१९.jpg-
P२५N९१६५४
सावर्डे : सावर्डे येथील सेवामार्गावर खड्डा बुजवताना जेसीबी.
-----
सावर्डेतील खड्ड्यावर मलमपट्टी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १५ : सावर्डे बाजारपेठेतील मुख्य सेवामार्गावर गेल्या दीड महिन्यापासून पडलेला मोठा खड्डा अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने भरला. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेतील गर्दीच्यावेळी हा खड्डा वाहतुकीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरत होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यावर माती व डांबरमिश्रित बारीक खडी टाकून दुरुस्तीचे काम केले. खड्डा पडल्यावर महिनाभर प्रतीक्षा का करावी लागते? दुरुस्ती तत्काळ व्हायला हवी होती. याबाबत सार्वजनिक बांधकामखात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते; परंतु नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष झाले. अपघातानंतर कारवाई करण्याऐवजी अगोदर खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक सूर्यकांत चव्हाण यांनी व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com