भटक्या कुत्र्यांवरील कारवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष

भटक्या कुत्र्यांवरील कारवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष

Published on

-ratchl१५१.jpg-
P२५N९१६९५
चिपळूण ः मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते.
----
भटक्या कुत्र्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष
शिवसेना आक्रमक ; मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा, चिपळुणात उद्या संयुक्त बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः शहरात ज्येष्ठ नागरिकासह महिला व चिमुकल्यांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला वाढतो आहे. या हल्ल्यात काही नागरिकही जखमी झाले आहेत. या वाढत्या त्रासाबाबत शिवसेनेच्यावतीने सोमवारी चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेण्यात आली. प्राण्यांवर व नागरिकांवर होणारे हल्ले वाढले असून, प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला.
या वेळी मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, कायद्यानुसार आम्ही कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करू शकतो; मात्र त्यांना शहराबाहेर हलविणे किंवा इतरत्र नेणे शक्य नाही. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, प्राणीप्रेमी आणि नागरिक यांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली आहे. या वेळी सेनेचे कार्यकर्ते म्हणाले, शहरात सातत्याने भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. काही सार्वजनिक ठिकाणी श्वानांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतात. उघड्यावर मांस-मच्छी टाकलेल्या ठिकाणी त्यांची संख्या जास्त पाहायला मिळते. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसह सर्व बाबींवर पालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.
चार दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनावरही चर्चा झाली. आतापर्यंत प्रत्येक मोहिमेत पाचशे कुत्र्यांची नसबंदी झाल्याचे फोटो मुख्याधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दाखवले; मात्र नसबंदीनंतर कुत्र्यांच्या कानावर टॅग का लावले गेले नाहीत, असा सवाल करण्यात आला. त्यावर पुढील वेळी टॅग लावून त्याचे फोटो नोंदवण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. शहरात वारंवार लहान पिल्ले फिरताना दिसत असल्याने नसबंदी प्रक्रियेची कार्यक्षमता संशयास्पद असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. सप्टेंबरअखेर निविदा प्रक्रिया पार पाडून आणखी पाचशे कुत्र्यांची नसबंदी केली जाईल. कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
या वेळी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महंमद फकीर, करामत मिठागरी, अंकुश आवले, राकेश देवळेकर, कपिल शिर्के, रश्मी गोखले, प्राजक्ता टकले, राणी महाडिक, प्रिया शिंदे, विनोद पिल्ले, सुकन्या चव्हाण, स्मिता खंडारे, सुवर्णा साडविलकर, दिशा किंजळकर, तृप्ती कदम, संध्या घाडगे, अपर्णा पवार, मनाली माने, शीतल सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com