इंग्रजीचा बाऊ करणाऱ्यांमुळे पटसंख्येत घट ः करंबेळकर

इंग्रजीचा बाऊ करणाऱ्यांमुळे पटसंख्येत घट ः करंबेळकर
Published on

91722

इंग्रजीचा बाऊ करणाऱ्यांमुळे
पटसंख्येत घट ः करंबेळकर

कणकवलीत माजी विद्यार्थी मेळावा

कणकवली, ता. १५ ः जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आजही दर्जेदार शिक्षण मिळते. मात्र, इंग्रजी शिक्षणाचा बाऊ करणाऱ्या पालकांमुळे पटसंख्या घटते आहे, अशी नाराजी सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर यांनी व्यक्‍त केली.
कणकवली शहरातील रा.बा. उचले विद्यामंदिर तालुका स्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.करंबेळकर बोलत होते. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका सायली गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुरा शिर्के, पालक प्रतिनिधी रेश्मा चव्हाण यांच्यासह शिक्षिका प्रियांका गोवेकर, वर्षाराणी प्रभू, मानसी असरोडकर, साक्षी घाडीगावकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला सायली गुरव यांनी शाळेच्या १६० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रशालेच्या देखभाल दुरुस्ती, जमीन सपाटीकरण, शौचालय बांधकाम, पोषण आहारासाठी स्वतंत्र खोली यांसारख्या कामांसाठी मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी अॅड. अभिजित सावंत, नितीन पटेल, अभिजित जाधव, सीमा उबाळे, मिलिंद पारकर, निलेश वरवडेकर, परशुराम परब आदींनी आपल्या शाळेबद्दल भावना व्यक्त केल्या. परगावी असलेले विद्यार्थीही या मेळाव्यास उपस्थित राहिले. शाळेसाठी निधी उभा करण्याचा सर्वांनी मनोदय व्यक्त केला. एका माजी विद्यार्थ्याने कार्यक्रमादरम्यानच शाळेसाठी वॉटर फिल्टर देण्याचे जाहीर केले. मानसी असरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. साक्षी घाडीगावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com