कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळित
-rat१५p२.jpg-
२५N९१६१९
लांजा ः वाकेडजवळ उलटलेला कंटेनर.
----
कंटेनर उलटल्याने वाहतूक विस्कळीत
वाकेडजवळ दुर्घटना ; १३ तासानंतर पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड-बोरथडे फाटा येथे खताची वाहतूक करणारा एक कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक १३ तास एकेरी सुरू होती. शनिवारी (ता. १३) रात्री ही दुर्घटना घडली.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने खत घेऊन निघालेला हा कंटेनर वाकेड-बोरथडे फाट्यावर आला, त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो महामार्गावर मध्येच कलंडला. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे थांबली होती. या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गाच्या एका बाजूने वाहतूक सुरू करून वाहतूककोंडी टाळली. अपघातानंतर लगेचच कंटेनर बाजूला करणे शक्य झाले नाही. त्यातील साहित्य बाहेर काढणे आवश्यक होते. त्यामुळे शनिवार रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत म्हणजेच सुमारे १३ तास वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. अखेरीस, कंटेनरमधील खत बाजूला काढल्यानंतर क्रेनच्या मदतीने तो हटवण्यात आला आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. या अपघातामुळे प्रवाशांना काही काळ विलंब झाला; मात्र कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. महामार्गावर प्रवास करताना वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.