विद्यार्थी झाले शिक्षक, अन् घेतला अध्यापनाचा अनुभव

विद्यार्थी झाले शिक्षक, अन् घेतला अध्यापनाचा अनुभव

Published on

-rat१६p४.jpg -
25N91911
शेनाळे: शिक्षकदिनाला शिक्षकी अनुभव घेणारे सातवीतील विद्यार्थी.

शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांच्या अंगी
आयएसओ शेनाळे शाळेचा उपक्रम ; अनोख्या पद्धतीने शिक्षकदिन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ : शिक्षक होणे किती जबाबदारीचे कार्य आहे याचा थेट अनुभव मंडणगड तालुक्यातील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शेनाळे येथे विद्यार्थ्यांना आला. शिक्षकदिनानिमित्त अनोखा उपक्रम हाती राबवण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी शिक्षक झाले आणि त्यांनी अध्यापनाचा अनुभव घेतला.
शिक्षकदिनानिमित्त आयोजित या उपक्रमात सातवीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन हाती घेऊन त्यांनी दिवसभर वर्गात शिकवण्याचा प्रयत्न केला. शिकवताना येणाऱ्या अडचणी, वर्गनियंत्रण, शिस्त राखणे अशा जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना खरी शिक्षकांची जबाबदारी किती कठीण आणि आहे, याचा प्रत्यय आला. या दिवशी सातवीतील वैष्णवी थोरात हिने मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत शाळेचे नियोजन उत्तमप्रकारे केले. तिच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी हा दिवस आनंदात घालवला. शाळेचे मुख्याध्यापक सुनील आईनकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावर्धनासाठी असे उपक्रम राबवले जातात. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक गणेश गुळेकर, सतीश खैरे, संतोष मोरे, संध्या शेले यांनी विशेष परिश्रम घेतले. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कार्य किती कष्टसाध्य व महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com