भाजपतर्फे ''सेवा पंधरवड्या''चे वेंगुर्लेतील कार्यशाळेत नियोजन
swt168.jpg
91870
वेंगुर्ले ः येथील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रसन्ना देसाई.
भाजपतर्फे ‘सेवा पंधरवड्या’चे
वेंगुर्लेतील कार्यशाळेत नियोजन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भाजपच्या वतीने देशभर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन वेंगुर्ले भाजप मंडलामार्फत बूथमध्ये करण्यात येणार आहे. याबाबत नियोजनासाठी सोमवारी (ता. १५) येथील भाजप कार्यालयात कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेस भाजप राज्य परिषद सदस्य तथा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, माजी मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, राजन गिरप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस, वंदना किनळेकर, प्रीतेश राऊळ, समिधा नाईक, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, अनुसूचित जाती मोर्चा बाळा जाधव, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, मंडळ चिटणीस चेतना रजपूत, प्रणाली खानोलकर, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, प्रमोद गोळम, नारायण परब, मकरंद प्रभू, प्रदीप मुळीक, सुभाष बोवलेकर, सत्यविजय गावडे, पुंडलिक हळदणकर, राहुल मोर्डेकर, सुभाष सावंत, अभय बर्डे, अनंत केळजी, मिलिंद साळगावकर, यशवंत परब, देवेंद्र डिचोलकर, संतोष शेटकर, मयुरेश शिरोडकर, गंगाराम परब, सुभाष सावंत, संतोष अणसूरकर, अनिल तेंडोलकर, अजित नाईक, रवींद्र खानोलकर, अजित नाईक, ईशा मोंडकर, हसीनबेगम मकानदार, रसिका मठकर, रुपाली नाईक, श्रद्धा धुरी, मनोहर खानोलकर, प्रदीप गवंडे, वासुदेव राऊळ, सत्यवान पालव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी, आभार प्रदर्शन विष्णू परब यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.