झाडींच्या आडून जीवघेणा प्रवास

झाडींच्या आडून जीवघेणा प्रवास

Published on

91893

झाडींच्या आडून जीवघेणा प्रवास

वाहनचालक त्रस्त; आजगाव-हनुमान मंदिर रस्त्याकडे दुर्लक्ष


सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १६ ः आजगाव ते हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडींमुळे प्रवास करणे सध्या जिकिरीचे बनले आहे. संबंधित विभागाला निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ, वाहनचालकात असंतोष पसरला आहे.
धाकोरे गावातून जाणारा आजगाव ते हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडींमुळे सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिगरीचे बनले आहे. गावातील रस्ते हे वळणावळणाचे असून, या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणजे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यात करून या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे तर धोका अधिकच वाढला असून, यासंबंधी धाकोरे ग्रामपंचायतीच्या वतीने ही वाढलेली झाडी तोडण्याबाबत मागील महिन्यात बांधकाम विभागाकडे निवेदन दिले होते. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाबाबत लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या या विभागाला या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ, वाहनचालकांत असंतोष पसरला असून, एखादी दुर्घटना घडली, तरच काम हाती घेणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे.
------------
वाहनांना बाजू देताना कसरत
एखादे मोठे वाहन या रस्त्यावरून जात असेल, तर वाहनांना बाजू देताना वाहनधारकांचा खूपच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत तत्काळ दखल घेऊन वाढलेली झाडी तोडून पुढील होणारा अनर्थ टाळावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com