मंडणगड- आरोग्य केंद्रात ४ विशेष तपासणी शिबिरे
आरोग्यकेंद्रात ४ विशेष तपासणी शिबिरे
मंडणगड तालुका; उपकेंद्रस्तरावर १९ पडताळणी शिबिरे
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ः महिलांचे आरोग्य ही सशक्त समाजाची पायाभूत गरज मानून केंद्र आणि शासनाच्या आरोग्यविभागातर्फे राज्यात स्वस्थ नारी-सशक्त परिवार अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मंडणगड तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांत ४ विशेष तपासणी शिबिरे व उपकेंद्रस्तरावर १९ पडताळणी शिबिरे आयोजित केली आहेत.
या अभियानाचा उद्देश महिलांचे आरोग्य सुदृढ करून कुटुंब व समाज अधिक सक्षम बनवणे हा आहे. मंडणगड तालुक्यात १८ ते ३० सप्टेंबर या मोहिमेअंतर्गत सर्व आरोग्यकेंद्रांमध्ये ४ विशेष तपासणी शिबिरे व सर्व उपकेंद्रस्तरावर १९ पडताळणी शिबिरे आयोजित केली आहेत. त्यात महिलांना विविध तपासण्या, उपचार व समुपदेशन सेवा मिळणार आहेत. या शिबिरांमध्ये विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सूमन व्यास, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पिंपळकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आशिष जाधव, बालरोगतज्ञ डॉ. साक्षी जाधव व डॉ. अक्षय पाटणकर यांच्या तज्ज्ञसेवांचा लाभ मिळणार आहे तसेच तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी या शिबिरामध्ये सेवा देणार आहेत.
मंडणगड तालुक्यात हे अभियान राबवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून डॉ. शुभांगिनी गिरासे यांची नियुक्ती केली आहे. महिलांकरिता विविध सेवा देण्यात येणार आहेत. गर्भवती व स्तनदा मातांची संपूर्ण आरोग्य तपासणी, किशोरी व प्रजननक्षम वयोगटातील महिलांचे वजन, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, गर्भाशय मुख व स्तन कर्करोग तपासणी, नेत्रतपासणी (डोळ्यांचे आजार व दृष्टीदोष), दातांची तपासणी, आहार व पोषण मार्गदर्शन, अॅनिमिया निर्मुलनासाठी आयरन-फॉलिक अॅसिड गोळ्यांचे वितरण, मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापन सल्ला सेवा कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्यावरील समुपदेशन, आयुष्यमान कार्ड, वय वंदनाकार्ड, अवयवदान नोंदणी, इतर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत.
कोट
अभियानांतर्गत तालुक्यातील महिलांना २३ शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची थेट सेवा मिळणार आहे. महिला निरोगी राहिल्यास कुटुंब, समाज आणि अखेर संपूर्ण राष्ट्र सशक्त राहते म्हणून सर्व महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.
- डॉ. अभिषेक गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी
चौकट
शिबिराची ठिकाणं
१८ सप्टेंबर-कुंबळे, आंबवली, १९ला तिडे पेवे, २३ला पणदेरी, म्हाप्रळ, वेळास; २४ला तुळशी, नायने, लाटवण; २५ ला पणदेरी-उमरोली-दहागाव; २६ला देव्हारे, पालवणी, सोवेली; २७ला आंबडवे, २९ला देव्हारे, अडखळ, वलोते; ३०ला नारगोली, वेसवी, पालघर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.