''रुद्रा'' प्रकल्पातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभ्यास
rat16p37.jpg
91965
रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह.
‘रूद्रा’ प्रकल्पातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभ्यास
रत्नागिरी विशेष कारागृह; गुन्हेगारांच्या पुनर्वसनाला मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : शासनाने गंभीर गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत गृहविभागामार्फत ''रूद्रा'' (Research Unit for Detections & Resolution of Anomalies in Criminals) प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये गुन्हेगारांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची मूळ कारणे शोधण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी येथील विशेष कारागृहातील गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जाणार आहे.
रत्नागिरीच्या कारागृहाला विशेष दर्जा असल्यामुळे येथील गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी शासनाची अपेक्षा आहे. हा प्रकल्प केवळ गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यापुरता मर्यादित नाही तर त्यातून मिळणाऱ्या माहितीचा वापर त्यांच्या पुनर्वसनावेळी योग्य कार्यक्रम आखण्यासाठी होईल. या अभ्यासातून गुन्हेगारी प्रवृत्ती आणि मानसिक विकारांमधील संबंधांवर अधिक स्पष्टता येईल, ज्यामुळे भविष्यात अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करणे शक्य होईल.‘रूद्रा’ प्रकल्पांतर्गत गुन्हेगारांना मानसशास्त्रीय समुपदेशन आणि उपचार दिले जातील. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत सुधारणा होऊन त्यांना त्यांच्या गुन्ह्यांमागील कारणे समजून घेण्यास मदत मिळेल आणि ते सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित होतील, अशी आशा आहे. या अभिनव प्रकल्पाद्वारे गुन्हेगारी जगातील गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेऊन समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट
प्रकल्पासाठी निधीची तरतूद
गृहविभागाने या प्रकल्पासाठी वार्षिक १८ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यानुसार, प्रत्येक तिमाहीसाठी ४.५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मे ते जुलै या पहिल्या तिमाहीसाठी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.