गुडघाभर पाण्यात गटाराचे बांधकाम

गुडघाभर पाण्यात गटाराचे बांधकाम

Published on

92015

गुडघाभर पाण्यात गटाराचे बांधकाम

वैभववाडीतील प्रकार; महामार्ग प्रधिकरणच्या कामाबाबत आश्चर्य

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ ः गुडघाभर पाण्यात गटाराचे बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार वैभववाडी शहरात सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडून हे काम सुरू असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने नारायण वडापाव सेंटरपर्यंत गटाराचे काम पूर्ण केले आहे. तेथून शुकनदीपर्यंतचे काम राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे. मात्र, दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नगरपंचायतीने बांधकाम केलेल्या गटारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. गटारात गुडघाभर अधिक पाणी साचलेले आहे. या पाण्यातच गटाराचे बांधकाम सुरू आहे. काँक्रीटीकरण पद्धतीने हे काम सुरू आहे. चक्क गुडघाभर पाण्यात काँक्रीट ओतले जात असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणच्या कामाच्या दर्जाबाबतच नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील अनेक नागरिकांनी या कामांचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. काम सुरू असताना महामार्ग प्रधिकरणचा कुणीही शाखा अभियंता किवा अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. त्यामुळे ठेकेदाराने गुडघाभर पाण्यात साधारणपणे २०० फुट गटारांचे बांधकाम केले आहे.
--------------
कामाचा दर्जा कसा राहणार?
गुडघाभर पाण्यात सुरू असलेल्या गटारांच्या बांधकामाचा दर्जा कसा राहणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर नागरिकांकडून व्हायरल होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका केली जात आहे.
--------------
कोट
पाण्याचा निचरा करूनच गटाराचे काम करावे, अशा सुचना ठेकेदाराच्या कामगारांना दिल्या होत्या. पाण्यात काम करीत असल्यास तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- पवन पाटील, शाखा अभियंता, महामार्ग प्रधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com