दोडामार्गात ‘सेवा पंधरावडा’ सुरू

दोडामार्गात ‘सेवा पंधरावडा’ सुरू

Published on

92154

दोडामार्गात ‘सेवा पंधरावडा’ सुरू

भाजपचा पढाकार; ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता


सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत म्हणून भाजपच्या वतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवली.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित केलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमाची सुरुवात रुग्णालयाची स्वच्छता करून करण्यात आली. या उपक्रमात रुग्णालयाच्या आवारात व परिसरात स्वच्छता करण्यात आली. रुग्णालयातील रस्ते, प्रवेशद्वार तसेच फुलबागा व झाडाझुडपांची सफाई करण्यात आली. हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आणि जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी राबविण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शहराध्यक्ष राजेश फुलारी, संयोजक संतोष नानचे, उपतालुकाध्यक्ष आनंद तळणकर, सुनील गवस, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, भाजप गटनेते नितीन माणेरीकर, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, संजय सातार्डेकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. उपस्थितांनी मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या संकल्पनेला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com