बांबू शेतीतून रोजगार, पर्यावरण संवर्धनाचा नवा प्रयोग

बांबू शेतीतून रोजगार, पर्यावरण संवर्धनाचा नवा प्रयोग

Published on

जागतिक बांबू दिवस विशेष - लोगो

rat17p12.jpg
92157
वडवली : भावेश कारेकर यांनी लागवड केलेली बांबू शेती.
rat17p13.jpg
92158
बांबू लागवडीसंदर्भात मार्गदर्शन करताना भावेश कारेकर.
------------

बांबू शेतीतून हरितक्रांतीचा ध्यास
भावेश कारेकर यांचा अभिनव प्रयोग; रोजगारनिर्मितीबरोबर पर्यावरण संवर्धनाची नवी वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः गेल्या काही दशकांत कोकणातील तरुणवर्ग नोकरी व उद्योगाच्या शोधात शहरांकडे वळला. शेतीकडे पाठ फिरवली गेल्याने पारंपरिक शेती व ग्रामीण रोजगारावर संकट कोसळले. अशा पार्श्वभूमीवर अभिनव प्रयोग म्हणून भावेश कारेकर या तरुणाने बांबू शेतीतून ग्रामीण भागात नव्या हरितक्रांतीची पायाभरणी केली आहे.
भावेश यांनी मित्रमंडळींच्या मदतीने तालुक्यातील वडवली येथे ५० एकरांवर बांबू लागवड केली असून, आगामी काळात हा प्रकल्प १ हजार एकरांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. आयटी क्षेत्रातील उच्चपदावरील नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ शेती व पर्यावरणीय प्रकल्पांना वाहून घेतले आहे. १८ सप्टेंबरला दरवर्षी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो. २००९ मध्ये थायलंड येथे झालेल्या जागतिक परिषदेतून या दिवसाची सुरुवात झाली. बांबू ही फक्त एक झाडेझुडपांची प्रजाती नाही, तर पर्यावरण आणि रोजगार यांचा संगम आहे.
बांबू झपाट्याने वाढतो आणि कार्बन शोषणाची क्षमता प्रचंड असल्याने हवामान बदलावर नियंत्रणात मदत होते. जमिनीची धूप रोखणे, पावसाचे पाणी शोषून भूजलपातळी सुधारणा, रासायनिक खतांशिवाय सहज टिकणारे पीक म्हणून मातीची सुपीकता टिकवून ठेवणे याचा फायदा होतो. बांबूवर आधारित बांधकाम साहित्य, फर्निचर, हस्तकला व इंधनक्षेत्रात स्थानिक रोजगारनिर्मिती होऊ शकते. यादृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व विक्रीसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे. महिला व युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रे व बांबू प्रक्रिया युनिटस्‌ उभारणीची योजना माध्यमातून कारेकर प्रयत्नशील आहेत. उपक्रमाला भोर, पुणे येथील नर्सरीधारक विनय कोलते यांचे तांत्रिक व प्रत्यक्ष सहाय्य लाभत आहे.

कोट
बांबू शेती म्हणजे केवळ लागवड नाही तर पर्यावरण, अर्थकारण आणि रोजगार यांचा समतोल साधणारा उपक्रम आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक शेतकरी या चळवळीचा भाग व्हावा आणि कोकणाला बांबूमधून नवा उद्योगविकासाचा मार्ग मिळावा. कोकणातील ही नवी चळवळ भविष्यात हजारो लोकांना रोजगार देणारी ठरणार असून, पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल उभे करण्याची क्षमता तिच्यात आहे.
- भावेश कारेकर

चौकट
दोन वर्षांत उत्पन्न
पुढील दोन वर्षांत त्यांना बांबू लागवडीमधून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल. एकरी साधारणपणे एक लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, त्यांचा हेतू फक्त लागवडीपुरता मर्यादित नाही. बांबूवर प्रक्रिया करून मंडणगड तालुक्यातच स्वतःचा उद्योग उभारण्याचे त्यांचे ध्येय आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच तालुक्याच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीलाही चालना मिळेल, भावेश कारेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com