जनसेवेच्या संकल्पनेतून आरोग्याचा नवा श्वास
92188
जनसेवेच्या संकल्पनेतून आरोग्याचा नवा श्वास
मालवणात भाजपतर्फे ‘सेवा सप्ताह’; पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्याचे ठरविले आहे. यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फोवकांडा पिंपळ येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, मंदार केणी, केदार झाड, बबलू राऊत, अशोक चव्हाण, रवींद्र टेंबुलकर, बाबू मांजरेकर, प्रमोद करलकर, पूजा करलकर, रवींद्र खानविलकर, रश्मी लुडबे, ललित चव्हाण, श्याम झाड, मुन्ना झाड, कॅलिस फर्नांडिस, मोहन कुबल आणि दिलीप सांगवेकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण ग्रामीण रुग्णालयात औषध आणि रुग्णांना फळवाटप करून सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सेवा सप्ताहात शहरातील ३२ प्रभागांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आणि युवा वर्गासाठी विविध शिबिरांचा समावेश आहे. सेवा सप्ताहाचा भाग म्हणून शनिवारी (ता. २०) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सकाळी १० वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आयुष्मान भारत आणि आयुष्मान वयोवंदन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध असेल.
-----
आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन
मोंडकर म्हणाले की, ‘‘आयुष्मान वयोवंदन या कार्डचा लाभ ७० वर्षांवरील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. त्याचे उत्पन्न कितीही असले तरी त्याला हे कार्ड दिले जाईल. या कार्डमुळे वर्षासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतील. हे कार्ड काढण्यासाठी संबंधित व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. सोबतच आधार कार्ड आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन येणे गरजेचे आहे. या शिबिरात रक्तदाब आणि मधुमेह यांची तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटपही केले जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून सामान्य आणि मध्यमवर्गीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.