रत्नागिरी- व्यक्तिमत्व विकासातून यश दृष्टिक्षेपात

रत्नागिरी- व्यक्तिमत्व विकासातून यश दृष्टिक्षेपात

Published on

rat17p11.jpg-
92156
रत्नागिरी : पदव्युत्तर पदविका पदविकेत देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अॅड. इंदुमती मलुष्टे यांचा सत्कार करताना अॅड. विलास पाटणे. सोबत अॅड. शाल्मली आंबुलकर.
-----
अॅड. इंदुमती मलुष्टे यांचा सन्मान
ग्राहक कायदा पदव्युत्तरमध्ये देशात प्रथम क्रमांकप्राप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : वडिलांचे संस्कार, अभ्यासू वृत्ती आणि नवनव्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची दृष्टी यामुळे ग्राहकमंचाच्या अध्यक्ष ॲड. इंदुमती मलुष्टे यांनी यश प्राप्त केले, असे उद्गार त्यांच्या सत्कारप्रसंगी रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी काढले.
ॲड. मलुष्टे यांनी बंगळूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे ग्राहक कायदाविषयक पदव्युत्तर पदविका विषयात देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. त्या वेळी अॅड. पाटणे बोलत होते. युपीएससी मुख्य परीक्षा दोनदा उत्तीर्ण होऊनही ॲड. इंदुमती यांना यश हुलकावणी देऊन गेले; परंतु हार न मानता त्या जिद्दीने पुढे चालत राहिल्या. यशदा आणि प्रबोधिनीमध्ये त्यांनी भारतीय राज्यघटनेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या स्व. अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या समन्वयक म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली, असे त्यांनी सांगितले.
अॅड. मलुष्टे म्हणाल्या, परीक्षेतील यशापेक्षा त्यातील अभ्यास माझ्यादृष्टीने महत्वाचा असतो. मुलांचा अभ्यास, कौटुंबिक जबाबदारी सांभाळत ग्राहक न्यायालयाचे काम केवळ वडिलधाऱ्यांनी मार्गदर्शन केले म्हणून शक्य झाले. कायम शिकत राहा, हे वडिलांचे उद्गार माझ्या कायम स्मरणात आहेत. अविनाश धर्माधिकारी आपले आदर्श आहेत. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ॲड. अवधूत कळंबटे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ वकील अशोक कदम, अॅड. प्रदीप नेने, ॲड. निनाद शिंदे, ॲड. शाल्मली आंबुलकर आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com