कणकवली येथील रुग्णालयात भाजपतर्फे स्वच्छता अभियान
92212
कणकवली येथील रुग्णालयात
भाजपतर्फे स्वच्छता अभियान
कणकवली, ता. १७ ः सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज भाजपतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयाभोवती वाढलेले रान ग्रासकटरच्या सहाय्याने कापून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमात जिल्हा उपाध्यक्षा संजना सावंत, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, प्रज्ञा ढवण, राजू पेडणेकर, अण्णा कोदे, विठ्ठल देसाई, समीर सावंत, संजय कामतेकर, समीर प्रभुगावकर, किशोर राणे, परशुराम झगडे, शिशिर परूळेकर, नामदेव जाधव, अभिजित मुसळे, बाबू गायकवाड, महेश सावंत, राजू हिर्लेकर, गणेश तांबे, सरपंच बंडू साटम, विजय चिंदरकर, सागर पवार, लवु परब, वामन परब, बाबू घाडीगांवकर, अभय गावकर, भाई काणेकर, चंद्रकांत परब, पंकज पेडणेकर, भाई सावंत, गौरव हर्णे, राजू नार्वेकर, इम्रान शेख, नंदू वाळके, अमजद शेख, रोहित ठाकूर, विश्वरूप लाड, प्रदीप ढवण, अरुण दळवी व प्रवीण दळवी आदी उपस्थित होते.