कलमठ गाव गोव्याच्या नकाशावर झळकवण्याचा निर्धार
92219
कलमठ गाव गोव्याच्या नकाशावर झळकवण्याचा निर्धार
ग्रामविकास फेरी; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रम
सकाळ
कणकवली, ता. १७ : कलमठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने गावातून ‘कलमठ ग्रामविकास फेरी’ काढण्यात आली. या फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या फेरीमध्ये पारंपरिक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या, संत गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा, ढोलपथक, महिलांच्या फुगड्या या सर्वांनी ग्रामविकास फेरीला देखणेपणा आणला. त्यानंतर कलमठ कलेश्वर सभागृहात सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. सभेचा शुभारंभ ८० वर्षीय आजी सुमती चिंदरकर आणि संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वप्नील मेस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
ग्रामसभेला ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. ग्रामसेवक प्रवीण कुडतरकर यांनी अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले, ‘‘१०० गुणांच्या कार्यक्रमात जबाबदारी वाटून घेऊया, कलमठ गाव राज्याच्या नकाशावर झळकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.’’
कार्यक्रमाला उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी सरपंच महेश लाड, स्वप्नील चिंदरकर, सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, सचिन खोचरे, पपू यादव, माजी सरपंच विनिता बुचडे, प्रीती मेस्त्री, प्रियाली आचरेकर, श्रेयस चिंदरकर, नजराणा शेख, देविका गुरव, निसार शेख, संपर्क अधिकारी चंद्रमणी कदम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.