सरकारतर्फे ग्रामीण विकासालाही प्राधान्य
92342
सरकारतर्फे ग्रामीण विकासालाही प्राधान्य
नीतेश राणे ः लोरे नं.१ मध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’
कणकवली, ता. १९ : केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारने ग्रामीण विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम सिंधदुर्गातही दिसून येत आहे. लोरे नं.१, कलमठ आदी गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक बदलांचा प्रवाह सुरू झाला आहे. त्याच धर्तीवर इतर सर्व गावे विकासाच्या नकाशावर आणली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या लोरे नं. १ येथे झाला. या कार्यकमाच्या शुभारंभ प्रसंग पालकमंत्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सरपंच अजय रावराणे, प्रांताधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, दिलीप तळेकर, संतोष कानडे, राजन चिके, राजू रावराणे, तन्वी मोदी, राजेश रावराणे आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागात सकारात्मक बदलांचा प्रवाह सुरू झाला आहे. लोरे अणि कलमठ ही गावे त्याची उत्तम उदाहरणे आहेत. आदर्श गाव कसे असावे हे पाहण्यासाठी प्रत्येक सरपंचाने लोरे गावाचा अनुभव घ्यावा. कणकवली तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात अनेक चांगले सरपंच कार्यरत असून कलमठ गावातील संदीप मेस्त्री यांचे काम उल्लेखनीय आहे.
-------
गावागावांत विकासाची चळवळ उभी करा
मंत्री राणे म्हणाले, ‘‘आता जिल्हा परिषदेने अशा सरपंचांची एक टीम तयार करून ती विविध गावांमध्ये पाठवावी, ज्यायोगे त्या त्या गावांतील सरपंच व सदस्यांना मार्गदर्शन मिळेल आणि अभियानाच्या माध्यमातून विकासाची चळवळ उभारता येईल. प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची दिशा आहे. पुढील पंधरा दिवसांत मनापासून काम करून गावागावांत विकासाची चळवळ उभी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.