-व्हॉलीबॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूल विजयी
rat१८p२.jpg-
२५N९२३३०
रत्नागिरी ः तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी झालेला मिस्त्री हायस्कूलचा संघ.
---
व्हॉलीबॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूल विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व फाटक हायस्कूल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. फाटक प्रशालेच्या मैदानावर झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मिस्त्री हायस्कूलने प्रतिस्पर्धी ए. डी.नाईक हायस्कूल संघाचा २-० डावाने पराभव केला. या सामन्यात फातिमा चरखे, मदिहा फणसोपकर, जेनब माखजनकर, नबा फणसोपकर, खदिजा वस्ता, अरफा खान, लाईबा धरमे, आदिना काझी, फरजाना मन्सुरी, अहाना केळकर, सानिया पावसकर, सिदरा वाडकर या मुलींनी दमदार खेळाने विरोधी संघाला पराभूत केले. मिस्त्री हायस्कूलच्या विजयाबद्दल प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, तालिमी इमदादिया संस्थेच्यावतीने संस्थाध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगावकर, शैक्षणिक व सामाजिक संस्था आदींच्यावतीने यशस्वी खेळाडू व क्रीडाशिक्षक सैफान चरखे यांचे अभिनंदन केले आहे.