शिरोड्यात उद्या आरोग्य चिकित्सा

शिरोड्यात उद्या आरोग्य चिकित्सा

Published on

शिरोड्यात उद्या
आरोग्य चिकित्सा
आरोंदाः भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा याबाबत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. २०) सकाळी ९ ते दुपारी २ या सत्रात महिला व बालकांसाठी (१४ वर्षांपर्यंत) आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण देसाई यांनी केले आहे.
.....................
मुणगे सोसायटीची
उद्या वार्षिक सभा
मुणगेः येथील श्री भगवती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मुणगेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २०) दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली आहे. या सभेमध्ये मागील सभेच्या ठरावांची अंमलबजावणीचा आढावा घेणे, जमाखर्चास मान्यता देणे, लेखा परिक्षण अहवाल तसेच दोषपूर्तता अहवालाचे वाचन व मंजुरी देणे, लेखा परिक्षकांची नियुक्ती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास ती त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेतली जाईल. सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन गोविंद सावंत व सरिता गुरव यांनी केले आहे.
......................
मुंबईत ऑक्टोबरमध्ये
महारोजगार मेळावा
सिंधुदुर्गनगरीः कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मुंबई येथे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. या महारोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेल्या नोकरी इच्छुक सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. उद्योजकांनी आपल्याकडील उपलब्ध रिक्तपदे पोर्टलवर महारोजगार मेळाव्यामध्ये अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी नसल्यास उद्योजक तसेच उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्याशी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही येरमे यांनी केले आहे.
.............
वेंगुर्ले आयटीआयमध्ये
ऑनलाईन प्रवेश सुरू
सिंधुदुर्गनगरीः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ले या संस्थेत प्रवेश सत्र ऑगस्ट २०२५ करिता मंजूर असलेल्या विविध व्यवसायांमधील जागांकरिता इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य यांनी केले आहे. राज्यातील शासकीय व खासगी संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्टच्या सत्रातील प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून २० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चित करणे नव्याने सुरू होणार आहेत. गुणवत्ता यादी २१ ला प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक उमेद्वारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आपले नव्याने नोंदणी करून जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन केले आहे. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ले येथे संपर्क साधावा, असे प्राचार्य यांनी कळविले आहे.
..................
‘यंग लीडर्स डायलॉग’
स्पर्धेत सहभागी व्हा
सिंधुदुर्गनगरीः युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकारच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांनी सहभागी होण्याचे आणि विकसित भारताच्या उभारणीत आपली भूमिका बजावण्याचे आवाहन मेरा युवा भारत, सिंधुदुर्गचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना नेतृत्व, चर्चा आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आहे. या संवादाची सुरुवात ''माय भारत क्विझ''ने होत आहे, जी १२ भाषांमध्ये आयोजित केली आहे. या क्विझमध्ये एकूण २० प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी १० मिनिटे दिली आहेत आणि सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. पहिल्या १० हजार विजेत्यांना मोफत ''माय भारत'' भेटवस्तू मिळतील.
........................
सिंधुदुर्गात रविवारी
‘नवसाक्षरता’ चाचणी
सिंधुदुर्गनगरीः केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी २०२५-२६ मधील परीक्षा जिल्ह्यात रविवारी (ता. २१) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी (योजना) नीलिमा नाईक यानी दिली. जिल्ह्यात ही परीक्षा मराठी व उर्दू भाषेतून होणार आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उल्लास संकेस्थळावर असाक्षरांची नोंदणी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून घेण्यात आलेली आहे, अशा सर्व असाक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेस नाव नोंदणी करून प्रविष्ठ होणाऱ्या असाक्षरांनी आपल्या गावातील शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी दिली.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com