कुरतडेत पंचायतराज अभियानासाठी समितीची निवड

कुरतडेत पंचायतराज अभियानासाठी समितीची निवड

Published on

-rat१८p१६.jpg-
२५N९२३६८
रत्नागिरी ः कुरतडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मार्गदर्शन करताना सरपंच प्रतीक्षा पालवकर.
-----
‘कुरतडेत पंचायतराज’साठी समितीची निवड
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १८ ः रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावाची विशेष ग्रामसभा कुरतडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच प्रतीक्षा पालवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपसरपंच सूरज जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुभाष भोवड, अनिल भाटकर, तंटामुक्त अध्यक्ष मोहन फुटक, संपर्क प्रमुख डॉ. कलगे व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामरोजगार सेवक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या संभाजीनगर येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रारंभाचे थेट प्रक्षेपण सर्व ग्रामस्थांना दाखविण्यात आले. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी अभियान संदर्भात कोणकोणते उपक्रम राबवावेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले व त्यानुसार विशेष ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान- ग्रामस्तरीय समितीची निवड करण्यात आली. सुशासनयुक्त पंचायत,
सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे आदींसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली. तसेच महसूल विभागांतर्गत पाणंद रस्ते व नमुना नं. २३ ला नमूद असलेल्या पायवाटा/रस्ते महसूल अभिलेखात नोंद करण्याबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती सभेत देण्यात आली.
-----
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या
गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर
पावस ः क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेतर्फे आयोजित धारपवार गणेशोत्सव स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये महाराष्ट्रातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला. माझा बाप्पा स्पर्धेत आठ, माझी गौराईमध्ये सात, पर्यावरण पूरक सजावटमध्ये १० असे एकूण २५ स्पर्धक सहभागी झाले. सर्व स्पर्धकांचे क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेतर्फे आभार मानण्यात आले. तिन्ही स्पर्धेमधून प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ असे एकूण १५ विजेते निवडण्यात आले आहेत. स्पर्धेचा निकाल असा ः माझा बाप्पा स्पर्धा- गणेश पवार (रायगड), राजेंद्र पवार, शशिकांत पवार, उत्तेजनार्थ- राहुल रेवंडकर, अनुश्री पवार. माझी गौराई- अर्चना यादव, स्वाती यादव, नीता पवार, उत्तेजनार्थ- तृष्णा पवार, रेश्मा पवार. पर्यावरणपूरक सजावट स्पर्धा- दिनेश शेलार, रवींद्र सागवेकर, तुषार पवार, उत्तेजनार्थ- आकांक्षा पवार, गणेश बालम. सर्व विजेत्यांना आणि स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र पाठवले जाणार आहे.
या स्पर्धेचा आणि वर्षभरात होणाऱ्या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या क्षत्रिय धारपवार स्नेहमेळावा आणि दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळ्यावेळी होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com