ःस्टीलची भांडी, पत्रावळींचा करणार वापर
-RATCHL१८१.JPG-
२५N९२४२२
चिपळूण ः पेढांबे येथील ग्रामसभेस उपस्थित महिला.
----
पेढांबे ग्रामसभा ठरली आगळीवेगळी
स्वच्छ घर–अंगण स्पर्धा; इकोफ्रेंडली उपक्रमांना चालना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः तालुक्यातील पेढांबे येथे झालेल्या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अनोखे उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी एक दिवस गावासाठी देण्याचे ठरले. या निमित्ताने स्वच्छ घर व स्वच्छ अंगण स्पर्धाही घेण्याचे ठरले. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्लास्टिक पत्रावळी, ग्लास न वापरता स्टीलची भांडी किंवा इकोफ्रेंडली पत्रावळी व ग्लासचा वापर करण्यास चालना देण्याचे ठरवण्यात आले.
पेढांबे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विजया पेढांबकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला गावातील २००हून अधिक महिला व ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या सभेत ग्रामपंचायत अधिकारी अनिता पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाची माहिती दिली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत जमा करावी यासाठी ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या आधुनिक साधनसामग्रीचा वापर करावा. शासकीय, निमशासकीय संस्थांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून लोकसहभागातून पावसाच्या पडणाऱ्या आणि उपलब्ध पाण्याचा ताळेबंद ठेवून त्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. ग्रामस्थांनी अपारंपरिक सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यावा. गावात घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी स्वच्छ घर व स्वच्छ अंगण स्पर्धा घेण्याचे ठरवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक पत्रावळीचा वापर केला जातो. ग्रामस्थांमध्ये जनजागृती होण्यासाठी स्टील किंवा इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करण्याचे ठरवण्यात आले. या वेळी उपसरपंच विलास तांदळे, सदस्य राजेंद्र कदम, शशिकांत शिंदे, समीर पेढांबकर, ऋतुजा शिंदे, गायत्री कुळे, प्रथमेश शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट
कचरा प्रकल्पास भेट देणार
एक दिवस गावासाठी देण्याचे ठरले. या दिवशी सर्वानुमते प्रत्येकवेळी वेगवेगळे उपक्रमाचा राबवण्याचा मानस महिलांनी व्यक्त केला. प्रत्येक कुटुबांने कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. गावात घनकचरा प्रकल्प राबवण्याच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील घनकचरा प्रकल्पास भेट देण्याचे ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.