‘युवा रक्तदाता’ संघटनेने 
जपली सामाजिक बांधिलकी

‘युवा रक्तदाता’ संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी

Published on

‘युवा रक्तदाता’ संघटनेने
जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः युवा रक्तदाता संघटना सावंतवाडीने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून दिले. संघटनेच्या सदस्यांनी गोव्यातील रुग्णालयांमध्ये आणि सावंतवाडी येथे रुग्णांना आवश्यक रक्तगट उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचवण्यास मदत केली.
येथील प्रदीप पोकळे यांना गोवा बांबोळी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी बी प्लस पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. सावंतवाडी येथून गणेश हरमलकर आणि संघटनेचे खजिनदार अनिकेत पाटणकर यांनी गोवा येथे जाऊन रक्तदान केले. माजगाव येथील सूर्यकांत सावंत यांनाही गोवा मणिपाल रुग्णालयात ‘बी प्लस पॉझिटिव्ह’ची आवश्यकता होती. आंबोली येथून परेश कर्पे आणि सावंतवाडीतील वैभव दळवी यांनी रक्तदान करून मदत केली. गोवा बांबोळी येथे सावंतवाडीतील युवकासाठी ‘ओ निगेटिव्ह’चे रक्तदान माणगाव येथील सूर्यकांत आडेलकर यांनी बसने गोवा येथे जाऊन रक्तदान केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात कृष्णाजी वर्दम यांना ‘ओ प्लस’च्या पीसीव्हीची तातडीने आवश्यकता होती. रोहित राऊळ यांनी ओरोस रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल युवा रक्तदाता संघटनेसह रुग्णांच्या नातेवाइकांनी आभार मानले. संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने केलेल्या या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com